‘फिरकीचा जादूगार’ म्हणून ओळखला जाणारा शेन वाॅर्नच्या (Shane Warne) मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. शेन वाॅर्नचा मृत्यू शुक्रवारी थायलंड येथे हृदय विकाराच्या झटक्याने झाला. भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (Ravichandran Ashwin) या दु:खद बातमीवर अजूनही विश्वास ठेवण्यास तयार नाही. अश्विनने मंगळवारी (८ मार्च) सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजाने फिरकी गोलंदाजीला नव्या रुपात परिभाषित केले आणि गोलंदाजीच्या कलेला आक्रमकता दिली आहे.
आर अश्विनने आपल्या युटयूब चॅनलवर म्हटले आहे की, “वाॅर्नने फिरकी गोलंदाजीला क्रिकेट क्षेत्रात वेगळेच स्थान निर्माण करुन दिले आहे. जगातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये मुथैय्या मुरलीधन, शेन वाॅर्न आणि अनिल कुंबळे यांची नावे आहेत. वाॅर्न हे मनमिळावू व्यक्तिमत्व होते. ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या खेळाडूंनी त्याच्याबद्दल चांगल्या आठवणी सांगितल्या आहेत. मला अजूनही या गोष्टीवर विश्वास होत नाहीये, आयुष्य किती क्षणभंगुर आहे. पुढे काय होईल सांगू शकत नाही.”
अश्विन म्हणाला, “शेन वाॅर्न हे रंगबिरंगी व्यक्तिमत्व होते. त्याने गोलंदाजीला एका वेगळ्या रुपात परिभाषीत केले आणि १००० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या. ही मोठी दुर्लभ उपलब्धि आहे. शेन वाॅर्नने जगातील फिरकी गोलंदाजीला आक्रमक बनवले आहे. प्रत्येक जण माईक गैटिंगला टाकलेल्या त्याच्या चेंडूबाबात चर्चा करत आहेत, परंतु त्याने टाकलेला माझा आवडता चेंडू म्हणजे २००५ साली ऍशेजमध्ये एंड्रयू स्ट्रॉसला मारलेला त्याचा चेंडू होता. त्याने त्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघासाठी एकट्याने सामना सांभाळला होता. तो एक असाधारण माणूस होता.”
अश्विन पुढे म्हणाला, “मी दूखी असलेल्या प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत बोलत होतो. एका फिरकी गोलंदाजाच्या शरीराचा वरचा भाग आणि खांदे मजबूत असायला हवेत. कारण चेंडू फिरवण्यासाठी हात खुप फिरवावा लागतो. लेग स्पिनरसाठी तर हे जास्तच महत्त्वाचे आहे. वाॅर्नचे खांदे खूप मजबूत होते. राहुल भाईने त्यांना विचारले होते की, त्याचे खांदे एवढे मजबूत कसे आहेत?. ऑस्ट्रोलिया रूल्स फुटबाॅल हा एक खेळ आहे, जो वाॅर्नला खेळायचा होता. परंतु तो खेळ खेळण्या लायक वाॅर्न नव्हता. कारण हा खेळ खेळणारे खेळाडू उंच आणि रुंद असतात.”
बालपणी वाॅर्नची २ हाडे तुटली होती. दोन्ही पायांना प्लास्टर झाल्यानंतर व्हीलचेयरवर बसून फिरत होता, त्यामुळे त्याचे खांदे मजबूत झाले. यावर बोलताना अश्विन म्हणाला, “वाॅर्न तेव्हा चालू शकत नव्हता, अंथरुनात पडून होता. त्याच्या हातांच्या मदतीने तो पुढे सरकत होता, त्यामुळे त्याचे खांदे मजबूत झाले आहेत. त्यांनी राहुल भाईला सांगितले आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. परंतु वाॅर्नने संकटांचा सामना करुन यश कसे मिळवावे, हे शिकवले.”
महत्त्वाच्या बातम्या
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ संघाची काय आहे ताकद अन् कमजोरी, जाणून घ्या सर्वकाही
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा: ऑल स्टार्स संघाची वॉरियर्स संघावर दोन धावांनी मात