साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.
चौथा सामना ज्या मैदानावर होणार आहे त्याचे नाव द रोझ बोल असे आहे. हॅंपशायर काऊंटीमधील साउथॅंप्टन हे सर्वात मोठे शहर आहे. या शहरात २००१मध्ये या मैदान तयाक करण्यात आले आहे. हॅंपशायर संघाचे हे चौथे होम ग्राऊॅंड आहे.
अशा या मैदानाबद्दल काही खास गोष्टी
-हे मैदान इंग्लंडमधील अन्य मैदानांसारखे मोठे नाही. याची क्षमता जेमतेम ६ हजार ५०० प्रेक्षकांची आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळी येथे २० हजार प्रेक्षकांची तात्पुरती बसायची सोय केली जाते.
-या मैदानावार आजपर्यंत अनेक लाईव्ह काॅंन्सर्टे्स होतात. त्यात ब्रायन अॅडम्सपासून बीली जाईलचा समावेश आहे.
-या मैदानावर २२ वनडे, २ कसोटी आणि ५ टी२० सामने झाले आहेत.
-१३ जून २००५ला इंग्लंड संघ मायदेशात प्रथमच याच मैदानावर आपला पहिला टी२० सामना खेळला होता.
-इंग्लंड या मैदानावर २ कसोटी सामने खेळला असुन २०११ला श्रीलंका-इंग्लंड सामना अनिर्णित राहिला होता तर २०१४ला भारत-इंग्लंड सामन्यात इंग्लंडने २६६ धावांनी विजय मिळवला होता.
-हे मैदान एखाद्या वर्तुळाकार नाट्यगृहासारखे साकारण्यात आले आहे.
-२०११ ला जो इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना झाला तेव्हा हे मैदान इंग्लंडमधील १०वे कसोटी मैदान बनले.
महत्त्वाच्या बातम्या-
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक
-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी