fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एफसी पुणे सिटी संघ एडब्लूइएस करंडक स्पर्धेत सहभागी 

पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी आपल्या मौसमाची पूर्वतयारी गोवा येथे २९ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या एडब्लूइएस करंडक स्पर्धेत सहभागी होऊन करणार आहे.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, एडब्लूइएस करंडक सामाजिक उपक्रम म्हणून खेळणार असून या स्पर्धेचा एक भाग झाल्याने आम्हांला आनंद  झाला आहे. तसेच हि एक चुरशीची स्पर्धा असून यामुळे आमच्या संघाला आपले कौशल्य आणि सामन्यातील आपली रणनीती सिद्ध करण्यासाठीचा योग्य प्लॅटफॉर्म आहे.

आगामी मौसमात होणाऱ्या उणिवा जाणून घेण्याची व त्या भरून काढण्यासाठी प्रशिक्षकांना या स्पर्धेमुळे मदत मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संघाला एकत्र येण्याची आणि प्रत्यक्ष परिस्थितीत योग्य क्रम शोधण्याची यामुळे संधी मिळणार आहे.

गतवर्षी या स्पर्धेत एफसी पुणे सिटीच्या राखीव खेळाडू असलेल्या संघाला उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी डेम्पो स्पोर्ट्स क्लबकडून १-० असा पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी क्लबने आपल्या वरिष्ठ संघाला खेळविण्याचे ठरविले आहे. अ गटात एफसी पुणे सिटी संघासह डेम्पो एससी, साळगावकर एफसी, एफसी गोवा या संघांचा समावेश आहे.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिगुल एंजल पोर्तुगल म्हणाले कि, आगामी २०१८-१९ मौसमासाठी संघाची बांधणी कशी होती आहे आणि मौसमापुर्वीच्या तयारीमुळे संघाला कशी मदत होत आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.  एडब्लूइएस करंडक स्पर्धेमुळे कोणकोणत्या गोष्टीवर तयारी करणे गरजेचे आहे हे लक्षात येणार आहे. तसेच हि स्पर्धा एक सराव स्पर्धा म्हणून आम्ही सहभागी होत नाही.

 

एफसी पुणे संघातील खेळाडूंची यादी: 

फॉरवर्ड्स: मर्सिलिन्हो परेरा, एमिलीयानो अल्फारो, दिएगो कार्लोस, इआन हुम, रॉबिन सिंग, राहुल यादव(राखीव), जेकब व्ही(राखीव); मिडफिल्डर: मार्को स्टॅंकोव्हिक, जोनाथन व्हिला, आदिल खान, गॅब्रियल फर्नांडिस, रोहित कुमार, शंकर संपिंगीराज, ऑल्विन जॉर्ज, अभिषेक हलदर(राखीव); डिफेंडर: मॅथ्यू मिल्स, मार्टिन डायज, गुरतेज सिंग, साहिल पन्वर, चुणीतिया फणाइ, केनन अल्मेडा, नीम दोरजी तमंग, तारीफ अखंड(राखीव), डिंपल भगत(राखीव); गोलरक्षक: अनुज कुमार, बिलाल खान(राखीव), देबप्रिय दास(राखीव).

 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान

एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक

 

      
You might also like