भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पहायाला मिळाले. पहिल्या दोन सामन्यात भारत, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्याने मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. अशात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात खेळपट्टी महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. दरम्यान आगामी सामन्यातील खेळपट्टीविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातील खेळपट्टी अगदी पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. परिणाम सामना तिसऱ्याच दिवशीच निकाली निघाला. तत्पूर्वी पहिल्या दोन सामन्यांचा निकाल देखील तिसऱ्याच दिवशी लागला. फरक फक्त एवढाच की पहिल्या दोन सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला, तर तिसऱ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतापेक्षा सरस कामगिरी करत विजय मिळवला.
तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टी अधिकच खराब असल्यामुळे आयसीसीने देखील याला खराब खेळपट्टीचा शेरा दिला. अशात चौथ्या कसोटीत खेळप्टटी कशी असणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामान्य खेळपट्टी तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी अशी खेळपट्टी तयार केली जात आहे, जिथे फिरकी आणि त्याचसोबत वेगवान गोलंदाजीला समान फायदा मिळेल. बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा हा शेवटचा सामना असून भारतासाठी यात विजय मिळवणे अतिशय महत्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा पक्की करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागणार आहे. इंदोरमधील कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपली जागा पक्की केली आहे. आता भारतीय संघ देखील याच प्रयत्नात आहे.
(How will the pitch be made for the 4th Test between India and Australia )
हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंडियाने जिंकला इराणी कप, यशस्वी जयस्वालने द्विशतकाच्या मदतीने दिले 357 धावांचे योगदान
भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर ‘ऐश्वर्या’च्या रूपात नवीन तारा, कोल्हापूरच्या लेकीची विम्बल्डनपर्यंत मजल






