Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटच्या इतिहासातील दुर्दैवी घटना! जहाज बुडाल्याने देशाची संपूर्ण क्रिकेट टीम पडलेली मृत्यूमुखी

क्रिकेटच्या इतिहासातील दुर्दैवी घटना! जहाज बुडाल्याने देशाची संपूर्ण क्रिकेट टीम पडलेली मृत्यूमुखी

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hong-Kong-Cricket-Team-Sink

जगभरात थोड्याफार दिवसांच्या किंवा वर्षाच्या अंतराने काही दुर्दैवी बातम्या ऐकू येत असतात. कधी एखादं विमान अपघातग्रस्त झालं,‌ कधी एखादी भयंकर आग लागली, तर कधी एखादं जहाज बुडालं. या सर्व घटनांमध्ये अपरिमित हानी होते. अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. कॅरेबियन बेटे आणि अमेरिकेदरम्यान असलेल्या बर्मुडा ट्रँगलमध्ये अशा घटना वारंवार आपल्याला दिसून येतात. अगदी दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यात कितीतरी मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलेला. जहाज बुडण्याच्या घटनांमधील आयकॉनिक घटना मानली जाते ‘टायटॅनिक’ हे जहाज बुडण्याची. कधीही न बुडणारे जहाज म्हणून या टायटॅनिकची जाहिरात केली गेलेली. मात्र, एका मोठ्या हिमनगाला धडकून आपल्या पहिल्याच प्रवासात जगातील हे सर्वात मोठे जहाज बुडाले. अशीच एक जहाज बुडण्याची घटना 1892 मध्ये घडलेली. ज्यामध्ये एका देशाची संपूर्ण क्रिकेट टीमच मृत्यूमुखी पडली. जाणून घेऊया त्याच दुर्दैवी घटनेची कहाणी.

ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता त्या ब्रिटिशांनी जगभरातील अनेक देशांवर आपला कब्जा केलेला. त्यापैकीच एक हाँगकाँग. ब्रिटिशांनी जसा क्रिकेटचा खेळ जगभरात पोहोचवला तसा तो हाँगकाँगमध्ये आणला. अगदी 1841 साली हाँगकाँगमध्ये क्रिकेट खेळण्याची नोंद आहे. पुढच्या दहा वर्षात हॉंगकाँग क्रिकेट क्लब सुरू झाला. तीच त्यांची नॅशनल क्रिकेट टीम बनली. ही टीम अनेक इंटरपोर्ट मॅचेसमध्ये सहभागी व्हायची. आशियात 1866 ते 1887 पर्यंत खेळल्या गेलेल्या मॅचेसना इंटरपोर्ट मॅचेस म्हटलं जायचं. त्यावेळी हाँगकाँग, श्रीलंका मलेशिया, सिंगापूर, शांघाय हे छोटे देश एकमेकांविरुद्ध खेळायचे. हाँगकाँगने 1866 मध्ये हाँगकाँगविरुद्ध आपली पहिली मॅच खेळलेली. पुढे 1890 ला ते त्यावेळचे सिलोन म्हणजे श्रीलंकेविरुद्धही खेळले.

त्यावेळी आत्तासारख्या मॅचेस होत नसत. कित्येक वर्षानंतर एखादी मॅच नॅशनल टीमला खेळायला मिळायची. 1892 ला एक मॅच खेळण्यासाठी हाँगकाँग टीम शांघायला आली. याच वर्षीच्या सुरुवातीला हाँगकाँगमध्ये एक मॅच खेळली गेलेली. त्यात हाँगकाँगचे कॅप्टन जॉन डून यांच्या शतकाने त्यांनी शांघायला डावाने हरवलेले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा दोन्ही टीम्स शांघायमध्ये खेळल्या. जानेवारीत झालेल्या पराभवाचे उट्टे यावेळी शांघायने बरोबर काढले. हाँगकाँगला दोन्ही इनिंगमध्ये शंभरी पार न करू देता त्यांनी विजय मिळवला. मोठ्या अपेक्षेने गेलेल्या हाँगकाँग संघाचा भ्रमनिरास झाला होता. चाहतेही नाराज होते.

त्यावेळी हाँगकाँगचे नेतृत्व करायचे सर जॉन डून. ते ब्रिटिश आर्मीतही कॅप्टन पदावर होते. सरेसाठी ते काऊंटी खेळलेले. संघातील तेच सर्वात वरिष्ठ आणि स्टार क्रिकेटर. शांघायकडून पत्कराव्या लागलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाने 8 ऑक्टोबर 1892 रोजी परतीचा प्रवास सुरू केला. पी अँड ओ स्टीमशिपचे एसएस बोखारा या जहाजाने त्यांचा प्रवास सुरू झालेला. एसएस बोखारा त्या वेळचे सर्वोत्तम प्रवासी जहाज मानले जायचे. 1872 पासून हे जहाज वापरले जायचे. 1884मध्ये झालेल्या महादिष्ट युद्धावेळी याच जहाजातून सैनिकांची ने-आण केली जायची.

शांघाय येथून निघाल्यावर जहाज आधी हाँगकाँग, त्यानंतर कोलंबो आणि शेवटी बॉम्बे म्हणजे मुंबईत येऊन थांबणार होते. 8 ऑक्टोबर रोजी जहाजावर 173 प्रवासी आणि 1500 टन सिल्क होते असे सांगण्यात येते. सोबतच चहा, मसाल्याचे पदार्थही शिपवर जमा केले गेलेले. 11 ऑक्टोबर रोजी जहाज हाँगकाँग येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, 9 ऑक्टोबर रोजी समुद्रात जबरदस्त वादळ निर्माण झाले. त्यामुळे जहाजाचा मार्ग हरवला. तरीही कॅप्टनने आपल्या कौशल्याचा वापर करत जहाज तैवानकडे नेण्याचा प्रयत्न सुरू केला. कॅप्टनला वाटलेलं हे वादळ जाईमेनकडे जाऊ शकते. परंतु दुर्दैवाने वादळाने आपली दिशा बदलली आणि ते तैवानच्या पश्चिम किनार्‍याकडे येऊ लागले.

तो दिवस लोकांनी अगदी दहशतीत काढला. मात्र, यातून आपली सुटका नाही याची कल्पना कॅप्टनला आलेली. कारण, होते वादळाची तीव्रता आणि पाऊस व ‌विजांचा कडकडाट. 10 ऑक्टोबर रोजी तीन महाभयंकर लाटा जहाजावर आदळल्या. जहाज बरेचसे झुकले. यामध्ये जहाजावरील माल पूर्णपणे नष्ट झाला. उरलीसुरली कसर विजेने भरून काढली. त्या विजेमुळे इंजिन आणि बॉयलर रूम बरबाद झाली. जहाजावरील इंजिनियर्सने शर्थीचे प्रयत्न केले‌. अखेर रात्रीच्या 11 वाजून 40 मिनिटांनी त्यांनीही हात टेकले. कॅप्टनने सर्व पॅसेंजर्सना डेकवर येण्याची सूचना केली. मात्र, पुढच्या पाच मिनिटात जहाज दोन वेळा खडकावर आदळले आणि अवघ्या दोनच मिनिटात बुडाले.
ही संपूर्ण घटना घडली, तेव्हा जहाज किनार्‍यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर होते. जहाजातील 150 लोक मृत्युमुखी पावले. जे जखमी होते, त्यांना स्थानिक चायनीज मच्छीमारांनी वाचवले आणि प्रथमोपचार करत हाँगकाँगला पाठवून दिले.

त्या जहाजावरील हाँगकाँगच्या 13 पैकी 11 खेळाडूंचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टर जेम्स लॉसन व लेफ्टनंट मार्खम हेच या दुर्घटनेतून वाचले. पुढे लॉसन 1898 पर्यंत हाँगकाँगसाठी खेळत राहिले. त्यावेळची इंटरपोर्ट सीरिज 1897 पर्यंत स्थगित केली गेली. पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा ही सीरिज सुरू केली गेली, तेव्हा तिला बोखारा-पोल मेमोरिअल सिरीज म्हणून नाव देण्यात आले. पुढे जाऊन अनेक वर्षांनी हाँगकाँग संघाने आयसीसीच्या असोसिएट नेशनचा दर्जा मिळवला. मात्र, त्यांच्या क्रिकेटचा हा दुर्दैवी इतिहास कायम राहिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर ‘ऐश्वर्या’च्या रूपात नवीन तारा, कोल्हापूरच्या लेकीची विम्बल्डनपर्यंत मजल
क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे ‘बॉब वूल्मर’, पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू


Next Post
Irani Cup

इंडियाने जिंकला इराणी कप, यशस्वी जयस्वालने द्विशतकाच्या मदतीने दिले 357 धावांचे योगदान

Navjot-Singh-Sidhu-And-Mohammad-Azharuddin

'कॅप्टन' विरुद्ध सिद्धू: अझहरूद्दीनमुळे नवज्योत पाजींनी अर्ध्यातच सोडलेला इंग्लंडचा दौरा, पण का?

Rahul-Dravid

विंडीजमध्ये 15 वर्षांनी जिंकली टेस्ट, आफ्रिकेत रचला इतिहास; तरीही द्रविडला का म्हणतात अपयशी कॅप्टन?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143