तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला गेलेली टीम इंडिया या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारताचे झिम्बाब्वेचे कार्यकारी मुख्य प्रशिक्षक असतील. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये खेळल्या जाणार्या आशिया कपच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात आली आहे. लक्ष्मण हे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर भारताच्या अंडर-१९ संघाचे प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनाही झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. हे दोघेही आता आशिया कप २०२२साठी भारतीय संघात सामील होतील. विशेष म्हणजे कानिटकर यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने यश धुलच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला होता. आयर्लंड दौऱ्यावर, सितांशु कोटक हे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते आणि आता कानिटकर प्रथमच वरिष्ठ संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याने अंडर-१९ संघासोबत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच त्याच्याकडे झिम्बाब्वे दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कानिटकर यांच्या कौशल्याचा फायदा वरिष्ठ संघालाही होईल कारण त्यांच्यासोबत अनेक खेळाडूंनी एनसीएमध्ये काम केले आहे. याशिवाय व्हीव्हीएस लक्ष्मणही असेल. सर्व खेळाडूंचा व्हीव्हीएसशी चांगला संबंध आहे.”
व्हीव्हीएस लक्ष्मण आता झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर हृषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावतील. या दोघांशिवाय साईराज बहुतुले भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला होणार आहे, तर इतर दोन सामने २० आणि २२ ऑगस्टला होणार आहेत. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये तीन सामने होणार आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
राशिदच्या खेळाला कोणाची लागली नजर? सध्याचा फॉर्म पाहून वाटेल हळहळ
‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप
पाकिस्तानी खेळाडूही देऊ लागले विराटला सल्ले; हा दिग्गज म्हणतोय, “त्याला स्वतःला…”