औंरंगाबाद, दि 23 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात हृतिक कटकम, शिवतेज शिरफुले, शार्दुल खवले यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या मुलांच्या गटात अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने महाराष्ट्राच्या प्रज्ञेश शेळकेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेने कर्नाटकच्या आदर्श दिलीपकुमारवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या शार्दुल खवलेने नीरज जोर्वेकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. तेराव्या मानांकित आयुष पुजारीने कुशाग्र अरोराचा 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत सज्जन(आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स सेक्युरिटीचे मुख्य कैलास मोहिते, एन्ड्युरन्स ग्रुपचे अभिनव मिश्रा, एआयटीए सुपरवायझर सेजल केनिया, ईएमएमटीसी सेंटर प्रमुख आशुतोष मिश्रा, ईएमएमटीसीचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण प्रसाद आणि प्रवीण गायसमुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.प्रज्ञेश शेळके(महा) 6-1, 6-0;
दर्श खेडेकर(महा)वि.वि.श्री राम राजेंद्रन (तामिळनाडू) 6-2, 6-1;
मिथ्रन लोगनाथन (तामिळनाडू)वि.वि.अंकित डिसूझा (तेलंगणा) 6-1, 6-1;
आयुष पुजारी(महा)(13)वि.वि.कुशाग्र अरोरा 6-4, 6-2;
नव्या यादव(दिल्ली)(10)वि.वि.आदित्य सिंग(दिल्ली) 6-0, 6-1;
दिशेंदर लांबा(हरियाणा)वि.वि.दर्श पाबुवाल(राजस्थान) 6-2, 6-1;
आरव गुप्ता (उत्तरप्रदेश)वि.वि.निकुंज खुराना (तेलंगणा) 6-2, 6-3;
फजल अली मीर (तामिळनाडू)(6)वि.वि.कबीर परमार (गुजरात) 6-0, 6-0;
शिवतेज शिरफुले(महा)(3)वि.वि.आदर्श दिलीपकुमार(कर्नाटक) 6-2, 6-4;
अथर्व श्रीरामोजू (तेलंगणा)वि.वि.आरव ढेकियाल (उत्तरप्रदेश) 6-3, 3-6, 6-3;
दक्ष पाटील (महा)वि.वि.शौनक सुवर्णा (महा) 6-4, 7-5;
श्लोक चौहान(15)वि.वि.लक्ष्य चुक्का(आंध्रप्रदेश)6-2, 6-4;
आराध्य म्हसदे(11)वि.वि.देवराज मंदाडे(महा)6-1, 6-1;
दोरागरी चित्तेपू(तेलंगणा)वि.वि.संकल्प सहानी(पश्चिम बंगाल) 6-4, 7-6(8);
शार्दुल खवले (महा)वि.वि.नीरज जोर्वेकर (महा) 6-2, 6-3;
दिगंत एम(कर्नाटक)(5)वि.वि.वीर महाजन(महा) 6-1, 6-0;
ओम पटेल(गुजरात)(8)वि.वि.शिवा शर्मा(हरियाणा) 6-0, 6-0;
ऋषी यादव (उत्तरप्रदेश)वि.वि.तनिश पाटील (महा) 6-1, 6-2.
महत्वाच्या बातम्या –
दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत 12 संघ सहभागी
अफगाणिस्तानने केले विजयाचे सीमोल्लंघन! पाकिस्तानच्या पदरी वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव