भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (BWF World Championship) उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, त्याला उपांत्यपूर्व फेरीत लोह कीन यूकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामूळे त्याची मोहीम तिथेच संपुष्टात आली. फायनलमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांत (Kidambi Srikanth) याचा पराभव करून लोह यंदा पुन्हा विश्वविजेता बनला. रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर प्रणॉयने आपल्या प्रवासाबद्दल एक खास पोस्ट लिहिली.
प्रणॉयने इंस्टाग्रामवर लिहिलेल्या या खास पोस्टमध्ये सांगितले की, स्पेनमध्ये झालेल्या या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत प्रायोजकांच्या मदतीने त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेत भाग घेता आला. प्रणॉयने सोशल मीडियावर आपल्या प्रायोजकांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत या बॅडमिंटनपटूने सांगितले होते की, जोपर्यंत त्याला आर्थिक मदत मिळेल तोपर्यंत तो खेळणार आहे.
प्रणॉयने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यातील त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२१ च्या माझ्या प्रवासाबद्दल काही खास. मी या स्पर्धेत खेळणार आहे हे मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या एक आठवडा आधी कळले. मात्र, प्रायोजक आणि निधीअभावी मी या स्पर्धेतून माघार घेणार होता. मग गो स्पोर्ट्स व्हॉईस पुढे आले आणि मला मदत केली. यामुळे मी मुक्तपणे आणि चिंता न करता खेळू शकलो आणि माझी सर्वोत्तम कामगिरी करू शकलो. गेल्या दशकापासून गो स्पोर्ट्स ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्याने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानू तितके कमीच आहे. कोणीतरी तुमच्या खेळावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहणे दुर्मिळ आहे. मला आशा आहे की, एखाद्या खेळाडूला कधीही अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही की त्याला पैशाची चिंता करावी लागेल, त्याऐवजी खेळाडूने फक्त प्रशिक्षण आणि स्पर्धेची तयारी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मला आशा आहे की अशी वेळ लवकरच येईल.’
https://www.instagram.com/p/CXqR4V5scyv/?utm_medium=copy_link
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांत याने रौप्य व युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन (Lakshya Sen) याने कांस्यपदक जिंकले. श्रीकांत या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारा पहिला भारतीय ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गजाने निवडली ‘टी२० टीम ऑफ द इयर’; चौघा भारतीयांचा समावेश
सीएसकेने ट्रायलसाठी बोलावलेला ‘हा’ खेळाडू नक्की आहे तरी कोण?