पाकिस्तान क्रिकेट संघाचा (pakistan team) संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (danish kaneria) याने २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी२० खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. दानिशने निवडलेल्या यावर्षीच्या सर्वोत्तम टी२० संघात त्याने चार भारतीय खेळाडूंना समील केले आहे. परंतु, त्याने निवडलेल्या या चार भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली (virat kohli) आणि रोहित शर्मा (rohit sharma) या दिग्गजांचा समावेश नाही.
दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनेवर या टी२० संघाची निवड केली आहे. त्याने फ्लेइंग इलेव्हनव्यतिरिक्त १२ व्या खेळाडूच्या रूपात एक अतिरिक्त नाव देखील सामील केले आहे. त्याने निवडलेल्या १२ खेळाडूंमध्ये चार भारतीय संघातील, तीन पाकिस्तान संघातील, इंग्लंडचे दोन, ऑस्ट्रेलियाचे दोन आणि न्यूझीलंड संघाच्या एका खेळाडूचा समावेश आहे.
दानिशने या संघाच्या सलामीवीराच्या रुपात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना निवडले आहे. पाकिस्तानच्या या दोन्ही खेळाडूंना यावर्षी टी२० विश्वचषकात अजोड कामगिरी केली होती. या दोघांनी एकत्र मिळवून ११६५ धावा केल्या आहेत आणि यामध्ये पाच वेळा मोठी शतकीय भागीदारी देखील सामील आहे. दानिशने निवडलेल्या त्याच्या संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी इंग्लंडच्या जोस बटलरला ठेवले आहे. बटलरने देखील या संपूर्ण वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे.
कनेरियाने त्याच्या संघात एकूण चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. त्याच्या संघातील चारही खेळाडू मधल्या फळीत खेळतील. त्याने इंग्लंड संघाच्या लियाम लिविंगस्टोन, ऑस्ट्रेलिया संघाच्या मिचेल मार्श यांना निवडले आहे, तर भारतीय संघातील रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन अष्टपैलूंना देखील निवडले आहे. संघात फिरकी गोलंदाजाच्या रूपात कनेरियाने ऍडम झंपा याला संधी दिली आहे.
कनेरियाच्या संघातली वेगवान गोलंदाजांचा विचार केला, तर त्याने पाकिस्तान संघाचा युवा आणि उत्कृष्ट गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी याला निवडले आहे. तसेच न्यूझीलंड संघाचा दिग्गज ट्रेंट बोल्ट याला देखील वेगवान गोलंदाजाच्या रूपात निवडले आहे. संघात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात भारताच्या जसप्रीत बुमराहला सामील केले गेले आहे. कनेरियाने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनव्यतिरिक्त त्याने संघात एका १२ व्या खेळाडूचा देखील समावेश केला आहे. भारताच्या रिषभ पंतला त्याने १२ व्या खेळाडूच्या रूपात सामील केले.
दानिश कनेरियाने निवडलेली २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी-२० प्लेइंग इलेव्हन –
मोहम्मद रिझवान, बाबर आझम, जोस बटलर, मिचेल मार्श, लियाम लिविंगस्टोन, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शाहीन शाह अफरीदी, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ऍडम झंपा व बारावा खेळाडू रिषभ पंत.
महत्वाच्या बातम्या –
भर मैदानात जागा झाला उस्मान ख्वाजातील डान्सर, दर्शकांपुढे केला भारी ‘मूनवॉक’; व्हिडिओ व्हायरल