---Advertisement---

पंजाब विरुद्ध राजस्थान सामना फिक्स होता? पंचांच्या ‘त्या’ चूकीमुळे संतप्त नेटकऱ्यांचे गंभीर आरोप

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 9:17 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय बाजी मारली. परंतु १९ व्या षटकात पंचांनी २ मोठ्या चुका केल्या, ज्यामुळे पंजाब किंग्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर मिम्स शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला कार्तिक त्यागीने अंतिम षटकात रोमाचंक विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती. परंतु त्याने अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला. शेवटचे षटक निर्णायक ठरले. परंतु तत्पूर्वीच्या १९ व्या षटकात पंचांकडून दोन मोठ्या चुका झाल्या होत्या.

तर झाले असे की, १९ व्या षटकात मुस्तफिजुर रहमानने २ नो बॉल टाकले, जे तिसऱ्या पंचांच्याही निदर्शनात आले नाहीत. याचमुळे सामना झाल्यानंतर चाहत्यांनी पंचांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा यांनी म्हटले की, “मुस्तफिजुर रहमानने आपल्या शेवटच्या षटकात २ नो बॉल फेकले होते, परंतु पंचांनी त्यावर दुर्लक्ष केले.”

एका युजरने सोशल मीडियावर पंचांना ट्रोल करत लिहिले की, “मुस्तफिजुरने १९ व्या षटकात २ नो बॉल टाकले तरी देखील पंचांच्या निदर्शनात आले नाही, ज्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आणि तुम्ही म्हणता आयपीएल सामने फिक्सिंग नसतात.” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तिसरे पंच मस्त सामन्याचा आनंद घेत झोपा काढत होते वाटतं. त्यांनी २ नो बॉल नाही दिले, ज्यामुळे पंजाब किंग्स संघाला २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला, आग लावून टाका तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाला.” तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “कोणी त्या २ नो बॉलबद्दल का बोलत नाहीये, जे रहमानने १९ व्या षटकात टाकले होते.”

या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत, राजस्थान रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली होती. यशस्वी जयस्वालने ताबडतोड ४९ धावांची खेळी खेळी.तसेच महिपाल लोमरोर याने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली.तर एविन लुईसने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना, सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी ताबडतोड सुरुवात करून दिली होती. केएल राहुलने ४९ तर मयंकने ६७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी निकोलस पुरणने देखील ३२ धावांचे योगदान दिले. परंतु पंजाब किंग्स संघाला आव्हानाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला. या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा; हवेत उडी मारत राहुलने एकहाती टिपला सॅमसनचा अवघड झेल

हा कोणता सरपटणारा प्राणी? लाईव्ह सामन्यात निकोलसने केलं असं काही की हसू हसू दुखेल पोट

असा विक्रम होणे नाही! आयपीएल इतिहासात कधीही न घडलेला पराक्रम, पंजाब-राजस्थान सामन्यात झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---