इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) १५ वा हंगाम मार्चमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोरमध्ये पार पडला. या वर्षीच्या आयपीएलमध्ये २ नव्या संघांनी सहभाग नोंदवला असल्यामुळे १० फ्रँचायझीनी ६०० सहभागी खेळाडूंवर बोली लावल्या. लिलावाच्या पहिल्या दिवशीच यूकेचे ऑक्शनर ह्यूज एडमिड्स (Hugh Edmeades) बेशुद्ध झाले आणि स्टेजवरून खाली कोसळले. त्यानंतर त्यांनी रविवारी (१३ फेब्रुवारी ) एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली आहे.
ह्यूज एडमिड्स म्हणाले, “मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, की मी आज तुम्हा सर्वासोबत लिलावात हजर नाहीये. मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. पण तरीही मला असे वाटते की मी लिलावात माझे १००% देऊ शकणार नाही जे बीसीसीआय, आयपीएल आणि सर्व खेळाडूंसाठी अनुचित आहे. ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली त्या सर्वांचा मी आभारी आहे.” त्यांचा हा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Mr. Hugh Edmeades – the IPL Auctioneer – is fine now 😊 and has a message for all. #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/U7uzt6PIMw
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
ह्यूज एडमिड्ससोबत घडलेल्या या प्रसंगानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने बंगळुरूमध्ये उपस्थित असलेले चारू शर्मा यांना मेगा लिलावासाठी ऑक्शनर म्हणून बोलवले आहे. ह्यूज एडमीड्सने या व्हिडीओत चारू शर्मा यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाला, “मी चारूचा आभारी आहे, जे लगेच तिथे पोहोचली आणि त्यानंतर त्यांनी मेगा लिलाव पुढे नेला. मी तुम्हाला लवकरच भेटेन.”
ह्युज एडमिड्स हे जेव्हा जमीनीवर कोसळले त्यावेळी वनिंदू हसरंगाची बोली सुरु होती. अचानक ते मंचावरुनच खाली कोसळले. चारू शर्मा हे प्रो कब्बड्डी लीगचे संचालक आहेत. तसेच आयपीएल २००८ मध्ये ते बँगलोर संघांचे साईओ होते.
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी उरलेल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. पहिल्या दुवशी सर्वात जास्त बोली इशान किशनवर लागली. त्याला मुंबई इंडियन्स संघाने १५.२५ कोटीना विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमुळे ‘या’ ४ खेळाडूंमध्ये वाढणार ‘भाईचारा’, वाद विवादामुळे आले होते चर्चेत
मेगा ऑक्शनदरम्यान रंगली २ चेहऱ्यांची चर्चा, अँकर दिशा आणि भावनाबद्दल जाणून घ्या सर्वकाही
IPL Auction: राजस्थानचा भिडू झाला ‘दिल्लीकर’; युवा चेतन साकारीयाला लागली इतक्या कोटींची बोली