फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्सचा स्टार गोलकीपर ह्यूगो लॉरिस (Hugo Lloris)याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती केली जाहीर आहे. त्याच्या काही तासांआधीच वेल्स फुटबॉल संघाचा कर्णधार व दिग्गज फुटबॉलपटू गॅरेथ बेल यानेही सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मागील महिन्यात झालेल्या विश्वचषकात (FIFA World Cup 2022) फ्रान्सला अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून पराभूत व्हावे लागले होते.
लॉरिसने 14 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याने फ्रान्सकडून 2018चा विश्वचषक आणि 2020-21 नेशन लीग जिंकली आहे. तसेच त्याने 2022च्या विश्वचषक अंतिम सामन्यात फ्रान्सचे नेतृत्वही केले होते. हा सामना फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा गमवावा लागला होता.
लॉरीस हा फ्रान्सचा सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाची भुमिका पार पाडणारा खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 145 सामने खेळताना 121 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर त्याने 4 विश्वचषक स्पर्धाही खेळल्या आहेत. यातील दोन विश्वचषक स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. त्याने ही निवृत्तीची घोषणा एका मुलाखतीदरम्यान केली. यावेळी त्याने माईक मैग्नन (Mike Maignan) हा फ्रान्सच्या गोलकीपरची जागा घेणार हे पण सांगितले. तो एसी मिलान क्लबचा खेळाडू आहे.
Our goalkeeper and captain 𝙃𝙪𝙜𝙤 𝙇𝙇𝙊𝙍𝙄𝙎 has retired from international football 🔚
🇫🇷 145 caps (record)
©️ 121 captaincies (record)
🏆 World Champion 2018
🥇 Nations League winner 2021A Legend 🙌
THANK YOU for everything Hugo 💙#FiersdetreBleus pic.twitter.com/1LaXmOK2by— French Team ⭐⭐ (@FrenchTeam) January 9, 2023
निवृत्तीबाबत 36 वर्षीय लॉरिस म्हणाला, “वेळ आली आहे निवृत्त होण्याची आणि ही जबाबदारी दुसऱ्याला सोपवण्याची. मी अनेकदा सांगितले आहे की, फ्रान्स संघ हा कोणा एकाचा नाही. माझ्यानंतरही फ्रान्सचा उत्तम खेळ सुरूच राहणार आहे कारण गोलकीपरही (मैग्नन) तयार आहे.”
लॉरीस हा इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (पीएल) टोटेनहॅम हॉटस्परकडून खेळता. तो आता क्लबच्या कामगिरीवर लक्ष देणार आहे. तसेच फ्रान्सचा पुढील सामना 24 मार्चला नेदरलॅण्ड्स विरुद्ध आहे, जो युरो 2024 स्पर्धेच्या पात्र फेरीसाठी खेळला जाणार आहे.
( Hugo Lloris retires from international football and names his replacement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: वनडेमध्ये रोहित-विराट, सूर्या नाहीतर ‘हा’ खेळाडू टीम इंडियाचा प्राण! पाहा भारताची प्लेईंग इलेव्हन
गॅरेथ बेलची सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्ती! रोनाल्डोच्या कारकिर्दीत राहिलेली महत्त्वाची भूमिका