भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवुड अभिनेत्री हुमार कुरेशीसोबतचा त्याचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हुमाने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा पोटो शेअर केला आहे. चाहत्यांसाठी ही माहिती आश्चर्यकारक आहे की, धवन लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा फोटो शेअर केला आहे. हुमाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अकेर मांजर बॅगमधून बाहेर आले आहे.” तिला या कॅप्शनमध्ये असे म्हणायचे आहे की, अखेर गुपीत सर्वांसमोर आले आहे. त्याने पोस्टमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांनाही टॅग केले आहे. पोस्ट अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तीन तासांच्या आतमध्ये या पोस्टवर तब्बल दिड लाखापेक्षा जास्त लाईक्स आल्या. तसेच शेकडो कमेंट्सही आल्या आहेत. हा फोटो दुसरे काही नसून हुमार आणि सोनाक्षी यांचा नवीन येणारा सिनेमा ‘डबल एक्सएल’चा (Double XL) फर्स्ट लूक आहे.
हुमार कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या डबल एक्सएल अलिकडच्या काही दिवसांमद्ये चर्चेत आहे. जाड शरिरयष्टी या विषयीवर हा चित्रपट बनवला गेला आहे. समाजाचे विचार बदलण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हटले जात आहे. जहीर इकबालकडून थोडी माहिती मिळाल्यानंतर शिखर धवन या सिनेमात असल्याचे समोर आले. त्यानंतर हुमानेही हा फोटो शेअर केला आहे. फोटोत धवन आणि हुमा हातात हात घेऊन डान्स करताना दिसत आहेत. हुमा आणि सोनाक्षीचा डबल एक्सएल 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
https://www.instagram.com/p/CjkRAsxpbxt/?utm_source=ig_web_copy_link
बॉलिवुडमध्ये पहिल्यांदाच काम करण्याविषयी धवनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “एका ऍथलीटच्या रूपात देशासाठी खेळताना आयुष्ट खूप व्यस्त आहे. चांगले मनोरंजक सिनेमे पाहणे मला आवडते. जेव्हा ही संधी मला मिळाली, मी सिनेमाची कथा ऐकली, तेव्हा माझ्यावर खूप प्रभाव पडला. हा संपूर्ण समाजासाठी एक प्रेमळ संदेश आहे. मला आशा आहे की, काहीही होऊद्या खूपसाऱ्या युवा मुली आणि मुले त्यांच्या स्पप्नांचा पाढलाग करत राहतील.”
दरम्यान, रोहित शर्मा आणि संघातील वरिष्ठ खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत धवने भारताचे नेतृत्व करत होता. धवनच्या नेतृत्वातील संघाने एकदिवसीय मालिकेत पाहुण्या आफ्रिकी संघाला 2-1 अशा अंतराने मालिका नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चालू वर्षावर सिराजचेच राज! आकडेवारी पाहून म्हणाल “वर्ल्डकपला हाच हवा”
दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा विक्रम! वनडे इतिहासात भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी