आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 ला पात्र ठरण्यासाठी धडपडत असलेल्या विंडीज संघाने आज आपले पात्रता फेरीचे अभियान जोरात सुरू केले आहे.
आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरूद्ध 50 षटकांत 4 विकेट्स गमावत विंडीजने तब्बल 357 धावा केल्या आहेत.
त्यात ख्रिस गेलच्या 123 आणि शिम्रोन हेटमेयरच्या 127 धावांचा सामावेश आहे.
गेलने 91 चेंडूंचा सामना करताना या खेळीत तब्बल 11 षटकार आणि 7 चौकारांची बरसात केली.
त्याचे हे वनडेतील 23वे शतक ठरले आहे. विंडीजकडून सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे. ब्रायन लारा 299 सामन्यात 19 वनडे शतके केली आहेत.
त्याने वनडे क्रिकेटमधील गांगूलीचा 22 शतकांचा विक्रम मोडत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 8व्या स्थानी झेप घेतली आहे.
CONGRATS!
Chris Gayle 100: 79 balls, 7×4, 8×6
His 23rd ODI century; most by a West Indian#CWCQ #RALLY #CENTURY pic.twitter.com/OBH3k365Z3— Windies Cricket (@windiescricket) March 6, 2018






