भारतात क्रिकेटच्या उत्सवाचा थरार रंगणार आहे. येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून सराव करत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
त्यातच मुंबई हे आयपीएल २०२१ हंगामाच्या नियोजित आयोजनाप्रमाणे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, मुंबईमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण पाहता बीसीसीआय आणखी एक राखीव ठिकाण शोधण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनने मदतीचा हात पुढे करण्याचे ठरवले आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच बीसीसीआयच्या चिंतेत वाढ होत चालली आहे. १० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याशिवाय एकूण १० आयपीएल सामने मुंबईत होणार आहेत. अशातच मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली तर राखीव ठिकाण असणे गरजेचे आहे. या कठीण काळात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन यांनी ट्विट करत मदत करण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे.
मोहम्मद अझहरुद्दीन यांनी ट्विट करत म्हटले की, “या कठीण काळात आपल्या सर्वांसाठी हे आणखी महत्वाचे होते की आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत उभे राहावे. अशातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयला स्टेडियमसह अन्य सुविधा देण्यासाठी तयार आहे. जेणेकरून संपूर्ण सुरक्षासह लीगमधील सामने आयोजित केली जाऊ शकेल.”
https://twitter.com/azharflicks/status/1378636212634677249
मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने असा इशारा दिला आहे की, मुंबईमध्ये लॉकडाऊन लागला तर राखीव ठिकाण म्हणून हैदराबाद आणि इंदोर ही राखीव ठिकाणं असतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हैदराबाद एक राखीव स्थळ आहे. परंतु प्रत्येक बाबीचा विचार करता. आम्ही मुंबईमध्येच सामना आयोजित करण्याचा विचार करत आहोत. कमी वेळात आणखी एक बायो बबल बनवणे कठीण असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कसे करणार पुनरागमन? जाणून घ्या नियम
अरर! क्विंटॉन डीकॉकच्या चालाखीमुळे फखर जमानचे दुसरे वनडे द्विशतक थोडक्यात हुकले, पाहा व्हिडिओ






