हैदराबाद, ४ नोव्हेंबर : एका गुणाचा फरक असलेले हैदराबाद एफसी आणि ओडिशा एफसी हे दोन संघ हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये शनिवारी भिडणार आहेत. हैदराबाद येथील जी.एम.सी बालयोगी ॲथलेटिक्स स्टेडियमवर यजमान अपराजित मालिका कायम राखण्यासाठी उतरणार आहेत. गतविजेत्या हैदराबादने चार पैकी ३ सामने जिंकून तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर ओडिशाही सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात आहेत.(Current Standings)
हिरो आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसीविरुद्ध झालेल्या थरारक लढतीत हैदराबादला ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यानंतर गतविजेत्यांनी सलग तीन विजय मिळवून १० गुणांसह तालिकेतील अव्वल स्थानावर दावा सांगितला आहे. हिरो आयएसएलच्या इतिहासात पहिल्या चार सामन्यांतील हैदराबादची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ हे यंदाच्या पर्वात ४-२-३-१ याच रणनीतीने संघ मैदानावर उतरवत आहे. पहिल्या सामन्यात मध्यरक्षक जोएल चीयानीजला दुखापत झाल्यानंतरही मार्क्यूझ यांनी रणनीतीत बदल केलेला नाही. झेव्हियर सिव्हेरियो या एकमेव स्ट्रायकरसह ते मैदानावर प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर देत आहेत.
ओडिशा एफसीविरुद्धही मार्क्य़ूझ संघात बदल करण्याची शक्यता फार कमीच आहे, परंतु चीयानीज याचे पुनरागमन हा सुरुवातीपासून खेळण्याची आणि बार्थोलोमेव ऑग्बेचे स्ट्रायकरच्या जबाबदारीत परतण्याची शक्यता आहे. ओडिशा एफसीविरुद्ध नायजेरीयन स्ट्रायकर ऑग्बेचेने सात गोल्स केले आहेत आणि ६ गोल सहाय्य केले आहेत. (Club Statistics)
”हा सामना आव्हानात्मक असणार आहे. ओडिशा एफसी हा मजबूत संघ आहे. आयएसएलमधील माझ्या पहिल्या वर्षात ओडिशाचा संघ तळाच्या क्रमांकावर राहिला होता. मागील पर्वात त्यांनी अव्वल चौघांत स्थान पटकावण्यासाठी दमदार खेळ केला. यंदाच्या वर्षात जोसेप गोम्बाऊच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कामगिरी अधिक बहरली आहे. पण, आमच्याविरुद्ध खेळणे त्यांनाही सोपं जाणार नाही, हेही तितकंच खरं,”असे मार्क्यूझ म्हणाले.
मार्क्यूझप्रमाणेच, ओडिशा एफसीचे मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना त्यांच्या रणनीतीशी छेडछाड करणे आवडत नाही. त्याच्या संघाने ४-३-३ सह उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे आणि हैदराबाद एफसीविरुद्धच्या सामन्यात हेच डावपेच असतील. या मोसमात आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये गोम्बाऊने आपले आघाडीचे तीन खेळाडू बदललेले नाहीत. (Club Statistics)
जेरी माविहमिंगथांगा आणि एन सेकर हे डिएगो मॉरीसिओसह संटर फॉरवर्ड म्हणून काम करत आहेत. सेकरने बंगळुरू एफसी विरुद्धच्या सामन्यात विजयी गोल केला. तरिही ओडिशाने अपेक्षित निकालाची नोंद केलेली आहे. गोम्बाऊ यांना प्रतिस्पर्धी संघांच्या ताकदीची कल्पना आहे आणि त्यामुळे आपल्या संघाने काय करायला हवं, हे ते जाणतात.
”हा सामना तुल्यबळ होईल. हैदराबादचा संघ चांगला आहे आणि यंदाच्या पर्वात ते अपराजित राहिलेले आहेत. त्यामुळेच हा सामना जिंकणे आमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही संघांची रणनीती जवळपास सारखीच आहे. चेंडूवर ताबा राखा आणि थेट प्रयत्न करा. त्यामुळे आम्ही जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,”असे गोम्बाऊ म्हणाले.
उभय संघांमध्ये झालेल्या सहा लढतींत हैदराबादने ३ विजय मिळवले आहेत, तर ओडिशाच्या वाट्याला २ निकाल आले आहेत. गतविजेत्या हैदराबादने ओडिशाविरुद्ध मागील पर्वात दोन सामन्यांत ९ गोल्स केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडू आता ‘या’ महत्वाच्या टी-20 लीगमध्येही खेळणार, क्रिकेट बोर्डाकडून मिळाली सूट
मॅथ्यू वेडचे मोठे विधान! म्हणाला, ‘शेवटच्या षटकात स्टॉयनिसला गोलंदाजी देणे म्हणजे…’