आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू झाला असून लगेच आज शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये कोलकता आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. तसेच दोन्ही संघांचा हा या सिजनमधील पहिलाच सामना आहे. पण एकीकडे कोलकताचा कर्णधार श्रेयस अय्यर तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आणि सर्वाधिक रक्कम मिळालेले मिचेल स्टार्क एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. याबरोबरच या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकला असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा सामना इडन गार्डन्सवर येथे खेळला जात आहे.
याबरोबरच श्रेयस अय्यर याने दुखापतीनंतर केकेआरसाठी कमबॅक केलं आहे. श्रेयसला दुखापतीमुळे 16 व्या हंगामाला मुकावं लागलं होतं. त्यामुळे नितीश राणा याने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता श्रेयसचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे नितीश राणा हा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तर सनरायजर्स हैदराबादने एडन मारक्रम याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन पॅट कमिन्स याला कॅप्टन केलं आहे.
दरम्यान केकेआर आणि एसआरएच दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या सामन्यात प्रत्येकी 4 खेळाडूंचा समावेश केला आहे. केकेआरमध्ये सुनील नरीन, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क आणि फिलिप सॉल्ट याचा समावेश आहे. तर हैदराबादमध्ये कॅप्टन पॅट कमिन्स,हेनरिक क्लासेन, एडन मारक्रम आणि मार्को जान्सेन या चौघांचा समावेश आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग 11-श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग 11- पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या-
- दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ, इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर
- शरद पवारांकडून मिळाली होती सचिनला फॉफर, मास्टर ब्लास्टरनं सुचवलं ‘या’ दिग्गजाचं नाव