एमएस धोनी कदाचित आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024साठी ऋतुराज गायकवाड याला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार बनवले गेले. सीएसकेला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा कर्णधार धोनी यावर्षी ऋतुराजच्या नेतृत्वात खेळत आहे. धोनी ना केवळ आयपीएलचा, तर भारतीय संघाचाही सर्वात यशस्वी कर्णधार आहे. असे असले तरी, धोनी भारताचा कर्णधार बनवण्याआधी सचिन तेंडुलकर याला ही संधी मिळाली होती. पण सचिननेच धोनीचे नाव कर्णधारपदासाठी सुचवले.
एमएस धोनी (MS Dhoni) 2007 साली भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात भारताने ट्रॉफी जिंकली होती. पण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने नुकतीच अशी माहिती दिली आहे की, 2007 साली त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळणार होते. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे तत्काली अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सचिनमध्ये याविषयी चर्चा देखील झाली होती.
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या पहिल्या सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर कॅमेंट्री बॉक्समध्ये होता. जिओ सिनेमावर चर्चा करताना सचिन म्हणाला, “शरद पवार 2007 साली बीसीसीआय अध्यक्ष होते. त्यांनी मला भारतीय संघाच कमान सांभाळायला लावले. पण मी फिट नव्हतो. संघाकडे एक असा कर्णधार असावा जो ड्रेसिंग रुममध्ये जाऊन घोट्याच्या दुखापतीवर उपचार गेईल, खांदे तपासून येईल. मला ये योग्य वाटत नाही. संघासाठी ही चांगली बाब नसती. पण एमएस धोनीविषयी माझे मत चांगले होते.”
“मी स्लिप्समध्ये उभा असायचो आणि धोनीशी खूप चर्चा व्हायची. मी नेहमी त्याला विचारायचो की, तू नक्की काय केले? त्याचे उत्तर खूपच बॅलंस असायचे. तो खूप योग्य आणि सोपे उत्तर द्यायचा. मैदानात सुरू असणाऱ्या गोष्टी तो ज्या पद्धतीने पाहायचा, हे कमालीचे होते. त्याचवेळी मी बीसीसीआय अध्यक्षांना सांगितले होते की, त्याच्या (धोनी) नेतृत्वगुण आहेत. कर्णधार म्हणून त्याची निवड केली जाऊ शकते.”
दरम्यान, एमएस धोनीच्या नेतृत्वात बारताने एक-दोन नाही तर तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषक, 2011 साली आयसीसी वनडे विश्वचषक, तर 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीने भारताला जिंकवून दिली. धोनी संघाच्या इतिहासात एकापेक्षा जास्त आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेवर कर्णधार आहे. तर विश्वचषक जिंकणारा कपिल देव यांच्यांनंतर केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. (Sachin Tendulkar was offered the captaincy of the Indian team by Sharad Pawar)
महत्वाच्या बातम्या –
454 दिवसांनंतर मैदानात परतल्यावर ऋषभ पंत भावूक! म्हणाला, लहान लहान…
टीम इंडियानंतर दिल्ली कॅपिटल्सचंही दुर्लक्ष, पंजाबविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉला संधी नाही