सिंधूजा रेड्डी साळगुटी ही आधी हैद्राबादकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू यापुढे अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात दिसेल. ऑगस्ट महिन्यात स्कॉटलँड येथे होणाऱ्या विश्वचषक टी२० पात्रता फेरीत ती अमेरिकेकडून खेळेल.
याबद्दल बोलताना सिंधुजा म्हणते की मला तेलंगणाचा असल्याच्या अभिमान आहे आणि मला ज्यांनी मार्गदर्शन केलं मी त्यांची आभारी आहे.
तिने अगदी लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिने हैद्राबाद संघाकडून १४, १६ आणि १९ वयोगटात क्रिकेट खेळलं आहे. २००८ मध्ये तिने राष्ट्रीय संघाकडूनही १९ वयोगटात सामने खेळले आहे.
हैद्राबाद संघाच्या १९ वयोगटाच्या क्रिकेट संघाची ती कर्णधार होती. परंतु नंतर लग्नामुळे ती अमेरिकेत राहायला गेली. सिंधुजा ही तेलंगणामधील नालगोंडा जिल्ह्यातील अमंगल गावाची आहे. तिने हैद्राबादमध्ये बीटेक आणि एमबीएच शिक्षण पूर्ण केलं आहे.
लग्नानंतर यष्टीरक्षक आणि सलामीवीर असणाऱ्या या खेळाडूने जवळजवळ क्रिकेट सोडूनच दिले होते. परंतु अमेरिकेत तिने पुन्हा क्रिकेटची कारकीर्द नव्याने सुरु करायचा विचार केला. अमेरिकेतील लोकल क्लबमध्ये खेळताना तिने निवड समिती सदस्यांना फलंदाजी आणि यष्टिरक्षण यातील तिची उजवी कामगिरी दाखवली. त्यामुळे तिची निवड या संघात टी२० विश्वचषक चमूत झाली.