भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी (१६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे या दौऱ्याला जाण्यापूर्वी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये त्याने विविध गोष्टींवर भाष्य केले आहे.
या दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीला हटवून रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते. तसेच विराटने काही दिवसांपूर्वीच टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे टी२० संघाचे कर्णधारपदही सध्या रोहितकडे आहे, तर विराट केवळ कसोटी संघाचा कर्णधार आहे.
असे असतानाच बीसीसीआयने माहिती दिली की, रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यातच विराट बीसीसीआयनच्या या निर्णयावर नाराज होऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात होती. यावरुन गेल्या काही दिवसात क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा झाली. मात्र, आता स्वत: विराट कोहलीनेच याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विराट वनडे मालिका खेळणार
विराटने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी उपबल्ध असणार आहे. त्याने बीसीसीआयला विश्रांती देण्याबाबत कोणतीही विनंती केलेली नाही. त्यामुळे आता विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार हे निश्चित झासे आहे.
विराटला वनडे कर्णधारपदावरुन हटवण्याची कल्पना नव्हती
वनडे कर्णधारपदावरुन काढल्याबद्दल विराट म्हणाला, ‘मला कसोटी संघाची निवड होण्याच्या दीडतासापूर्वी संपर्क करण्यात आला. माझ्याशी मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघाबद्दल चर्चा केली. त्यावेळी, मला शेवटी सांगितले की मी वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे आणि मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण, या निर्णयाबद्दल माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.’
आता विराट पूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सामन्यांना २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा कसोटी मालिका खेळवण्यात येईल. नंतर वनडे मालिका खेळली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
राखीव- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)
वनडे मालिका
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! दुसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी कर्णधार रुटला स्टोक्सनेच केले असते दुखापतग्रस्त, पाहा नक्की काय झाले
अरे बापरे! फलंदाजाने इतका जोरदार षटकार मारला की, प्रेक्षकाचे फुटले डोके, पाहा व्हिडिओ
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही? बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा