---Advertisement---

टीम पेनने सोडलेल्या झेलाबद्दल कामरान अकमलची प्रतिक्रिया, “मला आनंद वाटतो की…”

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 7:18 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात महत्वाच्या क्षणी झेल सोडले. यामुळे भारतीय संघाला पराभवाच्या गर्तेतूनही सामना अनिर्णित राखण्यात मदत झाली. पेनच्या या खराब कामगिरीबद्दल सर्व क्रिकेट वर्तुळातून त्याच्यावर टीका होत आहे. अशाच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने पेनबद्दल आनंद व्यक्त केला की तो पाकिस्तान संघाकडून खेळत नाही.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना कामरान अकमल म्हणाला, “मला आनंद होत आहे की पेन पाकिस्तान संघाकडून खेळत नाही. नाहीतर आतापर्यंत त्याच्याबद्दल माहित नाही काय काय बोलले गेले असते. आता मला बघायचे आहे की जे सर्व लोक माझ्याबद्दल बोलत होते ते आता या प्रसंगाबद्दल काय बोलतात. हा अतिशय उत्तम कसोटी सामना होता. ऑस्ट्रेलियन संघाने उत्तम लढाई केली.”

अकमल पुढे म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघ आता विजय साजरा करत असता, जर त्यांनी त्या कॅचेस घेतल्या असत्या. मात्र मॅचमध्ये तुमचा चांगला व वाईट दिवस येऊ शकतो. ऑस्ट्रेलियन टीमची ही खासियत आहे की ते जास्त चुका करत नाही. मात्र त्यांनी एकाच दिवशी भरपूर चुका केल्या. विशेषत: टीम पेनचा आजचा दिवस फारच खराब राहिला.”

महत्वाच्या बातम्या:

धोनी यंदाच्या आयपीएल हंगामात केवळ सीएसकेच्या संघबांधणीकडे लक्ष देईल

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

त्या ऐतिहासिक कसोटीची ९० वर्षं; एकही अर्धशतक न लगावता अवघ्या दीड दिवसात संपला होता सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---