---Advertisement---

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 6:37 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा खेळाडू रिषभ पंत मागील काही कालावधीत त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत होता. त्यामुळे त्याने मागील काही महिन्यात 10 किलो पेक्षा जास्त वजन कमी केले आहे. याचा खुलासा त्याचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी केला. कोरोनाच्या महामारी नंतर पुन्हा क्रिकेट सुरू झाले. त्यावेळी सर्वात पहिल्यांदा रिषभ पंतने आयपीएल स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान त्याचे वजने वाढल्याचे दिसले. ज्यामुळे खूप प्रमाणात त्याच्यावर टीका झाली होती.

आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना रिषभ पंत सपशेल अपयशी ठरला होता. ज्यामुळे त्याला वजनामुळे टीका सहन करावी लागली. परंतु द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तारक सिन्हा यांनी सांगितले की, रिषभ पंतला लॉकडाऊनमध्ये त्याच्या सरावात करण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सुरवातीच्या काळात फिट नव्हता. ज्याप्रकारे एका उच्चस्तरीय खेळाडूकडून केली जाते. परंतु सिन्हा यांनी सांगितले की, मागील काही काळात पंतने फिटनेसवर भरपूर काम केले आहे. आपल्या शरीरातील अतिरिक्त प्रमाणात असलेले फॅट कमी केली.

तारक सिन्हा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “लॉकडाऊनमध्ये रुडकी येथे आपल्या घरात अडकला होता. एका भारतीय खेळाडूला प्रशिक्षण घेण्यासाठी ज्या सुविधांची गरज असते. त्या त्याच्याकडे नव्हत्या. या कारणामुळे त्याचे वजन वाढले होते. परंतु दुबईमध्ये पोहोचल्यानंतर, त्याने आयपीएलसाठी खूप मेहनत घेतली.”

तारक सिन्हा यांनी आकाश चोप्रा आणि शिखर धवन सारख्या बर्‍याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. सिन्हा म्हणाले रिषभ पंत वाढत्या वजनामुळे चिंतेत नव्हता. परंतु यामुळे त्याचा आत्मविश्वास आणि फलंदाजी कमी झाली होती. रिषभ पंतने आयपीएल 2020 मध्ये 113.95 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 31.18 च्या सरासरीने 343 धावा केल्या आहेत. ज्यामधे फक्त एकच अर्धशतक ठोकले आहे.

तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करताना हा सामना अनिर्णीत राखला. यामध्ये रिषभ पंतने खूप मोलाचे योगदान दिले. त्याने 118 चेंडूचा सामना करताना आक्रमक 97 धावांची खेळी केली. त्यामुळे सिडनीत झालेला तिसरा कसोटी अनिर्णित राहिला.

महत्वाच्या बातम्या:

म्हणून मोहम्मद आमिरला वगळले होते, प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने केला खुलासा

त्या ऐतिहासिक कसोटीची ९० वर्षं; एकही अर्धशतक न लगावता अवघ्या दीड दिवसात संपला होता सामना

हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---