---Advertisement---

IND vs ENG: ‘मी येथे स्पष्टीकरण…..’, निवृत्तीच्या प्रश्नावर हिटमॅनच्या तळपायाची आग मस्तकात

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2025 9:05 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर आता भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारताने टी20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. आता एकदिवसीय मालिका उद्या म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. बुधवारी सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, हिटमॅनला त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, “तीन एकदिवसीय सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार असताना माझ्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणे किती प्रासंगिक आहे? माझ्या भविष्याबद्दलचे बातम्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी त्या अहवालांचे स्पष्टीकरण देण्यासाठी येथे आलो नाहीये.” तो म्हणाला, “माझ्यासाठी इंग्लंडविरुद्धचे तीन सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्वाचे आहे. माझे लक्ष या सामन्यांवर आहे आणि त्यानंतर पुढे काय होते ते मी पाहेन.”

नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये रोहित शर्माची कामगिरी लज्जास्पद होती. वैयक्तिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. यानंतर, पुढील 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात भारतीय कर्णधाराच्या बॅटमधून फक्त 31 धावा आल्या. खराब फॉर्ममुळे, रोहितने सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीतून स्वतःला वगळले होते. रोहितच्या अनुपस्थितीत, जसप्रीत बुमराहने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले.

फॉर्ममध्ये परतण्यासाठी, रोहित शर्माने देशांतर्गत क्रिकेटकडे वळले. रोहितने मुंबईकडून जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रणजी ट्रॉफी खेळली. या सामन्यातही रोहितला काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात रोहितने 19 चेंडूत 3 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने 35  चेंडूंचा सामना करताना 28 धावा केल्या.

हेही वाचा-

सरकारने भारतीय खेळाडूसाठी तिजोरी उघडली, बक्षीस म्हणून 1 कोटी रुपयांची घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने केली पंचांची यादी जाहीर..! भारतीय पंच यादीतून गायब
IND vs ENG; नागपूर वनडेसाठी संघाची घोषणा, 15 महिन्यानंतर या खेळाडूचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---