जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून एबी डिव्हिलिअर्स, भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, न्यूजीलँडचा केन विल्यम्सन तसेच इंग्लंडचा ज्यो रूट यांच्याकडे नेहमी पहिले जाते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कोण श्रेष्ठ यावर वादही होतात. परंतु मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलिअर्सने याच स्वतः खंडन केले आहे.
हा महान फलंदाज म्हणतो, ” माझ्याकडे इतरांपेक्षा वेगळी कौशल्य आहेत. तीच माझी ताकद आहे. परंतु म्हणून मी स्वतःला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणणार नाही. ”
” मी मला सर्वोत्तम किंवा सर्वश्रेष्ठ म्हणणे हा विराट कोहली, डेविड वॉर्नर, ज्यो रूट किंवा अन्य प्रतिभावान फलंदाजांचा अपमान असेल. जगात खूप गुणवान खेळाडू आहेत. माझ्याकडे बरीच वेगळी आणि चांगली कौशल्य आहेत जी इतर फलंदाजांमध्ये नाही. तसेच इतर फलंदाजांमध्ये जी काही चांगली कौशल्य आहेत ती माझ्यात नाही. ” असेही हा नम्र खेळाडू पुढे म्हणतो.