भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सांगितले आहे की, आज तो भारतीय संघात खेळत आहे. याचे संपूर्ण श्रेय भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांना जाते.
जॉन यांच्याविषयी बोलताना बुमराह म्हणाला की,” ते जॉन राइटच आहेत, ज्यांनी माझ्यातील प्रतिभेला ओळखले आणि माझ्या गोलंदाजीला अनेक पैलू पाडले.”
जॉन राइट जेव्हा मुंबई इंडियन्स संघाशी जोडले गेले होते, तेव्हा त्यांनी मुंबई इंडियन्स संघासाठी बुमराहची निवड केली होती. त्यानंतर बुमराहने त्याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर संघात त्याचे स्थान पक्के केले.
क्रिकबजला दिलेल्या एका मुलाखतीत बुमराहने सांगितले की, “जेव्हा मी 19 वर्षाचा होतो, तेव्हा मी गुजरात संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी मुंबईत आलो होतो. तेथे मुंबईचे प्रशिक्षक जॉन यांनी मला खेळताना पाहिले आणि माझे कर्णधार पार्थिव पटेल याच्याशी माझ्या संदर्भात चर्चा केली.”
“पार्थिव पटेल यानी मला याबाबतीत सांगितले होते. पण तेव्हा मला हे खरे वाटले नाही आणि मी त्यांना म्हणालो होतो की, मजा करू नका. आता तरी कुठे मी 1-2 देशांतर्गत सामने खेळले आहेत आणि मला माहिती आहे एवढ्या लवकर आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी कोणाची निवड केली जात नाही.” असेही बुमराहने पुढे सांगितले.
बुमराह त्याच्या गोलंदाजीचे पूर्ण श्रेय जॉन यांना देत म्हणाला, “जॉन यांच्याकडे टॅलेन्ट (कौशल्य) ओळखण्याची चांगली क्षमता आहे आणि मी नशीबवान होतो की त्यांनी मलाही संधी दिली. यानंतर त्यांनी माझ्या गोलंदाजी आणि फिटनेसवर खूप काम केले. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे.”
‘मी आजही प्रशिक्षक जॉन यांच्या संपर्कात आहे आणि माझ्या खेळासंदर्भात मी त्यांच्याशी सल्ला-मसलत करत असतो. याचबरोबरच, तुमच्यामुळे मी आज भारतीय संघात आहे,’ असेही त्यांना म्हणत असतो. मात्र, जॉन यावर प्रत्युत्तर देत म्हणतात की, मी असे काही केले नाही. तू तुझ्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या बळावर येथे आहेस. याबरोबरच बुमराहने या व्हिडिओत त्याच्या खेळाशी संबंधित बर्याच गोष्टींबद्दलही सांगितले आहे.
बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2016मध्ये केली. त्याने आतापर्यंत 13 कसोटी, 64 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. सध्या शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळत आहे.
न्यूझीलंडचा हा खेळाडू म्हणतो, भारताच्या 'त्या' फलंदाजाची विकेट ठरली टर्निंग पाँईट
वाचा- 👉https://t.co/ejZcqhm7O0👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020
न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, हा खेळाडू दोन दिवस उतरणार नाही मैदानात…https://t.co/uvM3g900PH#म #मराठी #cricket #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020