भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (harbhajan singh) याने शुक्रवारी (२४ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. हरभजन सिंग मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर होता. मात्र, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नव्हती. परंतु अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. अशात हरभजनने निवृत्ती घेण्यासाठी येवढा उशीर का केला, याविषयी मोठा खूलासा केला आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना हरभजन म्हणाला की, “कोणी ४०० पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेतो आणि नंतर त्याला संधी मिळत नाही. संघातून बाहेर करण्याचे कारण सांगितले जात नाही, तेव्हा डोक्यात अनेक प्रश्न उपस्थित होतात. मला संघातून बाहेर करण्याचे कारण मी अनेक लोकांना विचारले. मात्र, मला कोणीच उत्तर दिले नाही.”
तो पुढे म्हणाला की, “समर्थन असल्यावर नेहमीच चांगले वाटते. मी म्हणेल की, योग्य वेळी मला समर्थन मिळाले असते, तर मी खूप आधी निवृत्ती घेतली असती. मी जेव्हा ४०० विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हा माझे वय ३१ वर्ष होते आणि ५००-५५० विकेट्स घेतल्यानंतर निवृत्ती घेतली असती. जर मी तीन-चार वर्ष अजून खेळलो असतो, तर ५०० विकेट्सचा आकडा गाठला असता, परंतु असे नाही झाले.”
दरम्यान, हरभजनने शुक्रवारी सोशल मीडियावरून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने सहकारी खेळाडू आणि चाहत्यांचे आभार मानले. तसेच पत्नी आणि मुलगी यांच्यासाठीही खास संदेश दिला की, आता तो त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स या संघांसाठी खेळला आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता अशा बातम्या समोर येत आहेत की, हरभजन आता एका आयपीएल फ्रेंचायझीसोबत गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सामील होणार आहे. अशात येत्या काळात हरभजन काय निर्णय घेतो हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
श्रीसंतची प्रतिक्षा संपणार! ९ वर्षांनंतर करणार ‘त्या’ मानाच्या स्पर्धेत पुनरागमन
दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
SAvsIND, Live: सेंच्युरीयन कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व! राहुलचे दमदार शतक
व्हिडिओ पाहा –