---Advertisement---

…म्हणून कारकिर्दीत आलेल्या परिवर्तनाबद्दल शमीने दिले स्वत:लाच श्रेय

On: शनिवार, जून 29, 2019 2:30 PM
---Advertisement---

गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात भारताने विंडीज विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवून या स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात मोहम्मद शमीने 6.2 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्स घेउन महत्त्वाचा वाटा उचलला.

शमीला या विश्वचषकात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध संधी दिली होती. त्याने या संधीचा चांगला फायदा घेत दोन्ही सामन्यात प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. याबरोरच यावर्षी वनडेमध्ये शमी भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे.

पण शमीला मागील दिड वर्षात फिटनेस पासून ते अनेक वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्याला मागीलवर्षी फिटनेसमुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. त्याचबरोबर त्याला घरगुती हिंसा सारख्या आरोपांनाही सामोरे जावे लागले होते. ज्यामुळे त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही काढून टाकण्यात आले होते.

पण या समस्यांचा सामना करत त्याने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली. त्याच्या कारकिर्दीत झालेल्या या परिवर्तणाबद्दल शमीने स्वत:ला श्रेय दिले आहे.

याबद्दल विंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर शमी म्हणाला, ‘श्रेय, पूर्ण श्रेय मलाच आहे. कारण मी ज्या गोष्टीतून जात होतो त्या गोष्टींना मलाच सहन करावे लागले होते. मागील 18 महिन्यात मी ज्या गोष्टीतून गेलो, त्या सर्व गोष्टींचा सामना फक्त मी केला आहे. त्यामुळे माझ्या कामगिरीचे श्रेय मलाच आहे.’

‘नक्कीच, मी कौटुंबिक वाद ते फिटनेस या सर्व गोष्टींशी लढण्यासाठी अल्लाहने मला धैर्य दिले त्याबद्दल त्याचे आभार मानेल. आता मी फक्त माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.’

त्याचबरोबर फिटनेसबद्दल शमी म्हणाला, ‘ही गोष्ट फक्त योयो टेस्ट मध्ये नापास होण्याची नाही. अशीही वेळ असते जेव्हा तूमची लय बिघडते. मी या टेस्टमध्ये नापास होणे वेगळी गोष्ट होती. पण मी त्यावर काम केले आणि माझ्या फिटनेसमध्ये सुधारणा केली.’

‘आता मला वाटते मी चांगल्या लयीत आहे. कारण मी वजन कमी केले आहे. आता माझ्यासाठी सर्वकाही सुरळीत सुरु आहे.’

‘आता मी माझा डाएट सांभाळतो, सातत्याने सराव करतो. आता मला लगेचच थकल्यासारखे वाटत नाही. माझी गती देखील वाढली आहे. कौशल्याबाबत सांगायचे तर मला नेहमीच वाटते की मी कोणत्याही खेळपट्टीवर चांगली कामगिरी करेल.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सॅल्यूट सेलिब्रेशनची कॉपी करण्याबद्दल शमीला शेल्डन कॉट्रेलने दिले हिंदीत उत्तर

व्हिडिओ: आज पावसामुळे नाही तर चक्क मधमाशांमुळे थांबला दक्षिण आफ्रिका-श्रीलंकामधील सामना

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत; बीसीसीआयने शेअर केला फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment