---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत; बीसीसीआयने शेअर केला फोटो

On: शुक्रवार, जून 28, 2019 8:12 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात रविवारी(30 जून) भारत आणि इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. शुक्रवारी(28 जून) भारतीय संघाच्या अवे जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.

ही जर्सी केशरी आणि गडद निळ्या रंगाची आहे. या जर्सीच्या हाताला आणि पाठिला केशरी रंग आहे. तर पुढील बाजूला गडद निळा रंग आहे.

भारतीय संघाचे अधिकृत किट उत्पादक, नाईकीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘भारतीय संघ 30 जून 2019 ला बर्मिंगहॅमला पहिल्यांदा अवे जर्सी घालेल. या वर्षी अनावरण करण्यात आलेले वनडे आणि अवे किट हे भारताची युवा पीढी आणि राष्ट्रीय संघाची निडरता यावरुन प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे.’

तसेच या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘वनडे किटप्रमाणे अवे किटही खेळाडूंच्या अधुनिक गरजा आणि गतिशील हालचाली लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. तसेच हे किट घामाच्या जागांनाही लक्षात ठेवूनही तयार केले आहे. ज्यामुळे खेळाडूंना मैदानात आरामदायी वाटेल.’

‘त्याचबरोबर किटमध्ये काही बदल केले आहेत ज्यामुळे ही जर्सी हलकी, आरामदायी आहे आणि खेळाडूंना मैदानात चपळ राहण्यात मदत करेल.’

या विश्वचषकात भारतीय संघ पहिल्यांदाच अवे जर्सी घालणार आहे. या जर्सीचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अवे जर्सीचे अनावरण करण्यामागील कारण असे की काही दिवसांपूर्वी आयसीसीने जर्सीबद्दल एक नवीन निर्णय घेतला आहे. अनेक संघांच्या जर्सी एकच रंगसंगती असल्याने गोंधळ होऊ नये म्हणून आयसीसीने घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी वेगवेगळ्या जर्सीचा नियम लागू केला आहे.

त्यामुळे इंग्लंडची जर्सी निळ्या रंगाची असल्याने भारताला अवे जर्सी (बाहेरच्या सामन्यांसाठी असलेली जर्सी) घालावी लागणार आहे.

तसेच या नियामानुसार इंग्लंड यजमान संघ असल्याने ते त्यांची प्रमुख जर्सी बदलणार नाही. तर ऑस्ट्रेलिया, विंडीज आणि न्यूझीलंडच्या जर्सीचा रंग अन्य सर्व संघांच्या जर्सीच्या रंगापेक्षा वेगळा असल्याने त्यांना दुसऱ्या जर्सीची गरज नाही. पण या चार संघाव्यतिरिक्त अन्य संघांना त्यांची दुसरी जर्सी घालावी लागणार आहे.

हा निर्णय आयसीसीने फुटबॉलच्या सामन्यांवरुन प्रेरित होऊन घेतला आहे. फुटबॉलमध्ये घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी वेगवेगळी जर्सी असते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

‘सामनावीर’ कोहलीचे नाव सचिन-जयसुर्या सारख्या दिग्गजांच्या यादीत आता सन्मानाने घेतले जाणार

मोहम्मद शमीने केला नवा विश्वविक्रम; स्टार्क, बोल्टसारख्या गोलंदाजांनाही टाकले मागे

आयसीसीने श्रीलंकेला दिली ‘ही’ लकी जर्सी घालण्याची परवानगी, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment