दक्षिण आफ्रिका संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांच्या हाती निराशा लागली. विश्वचषक 2023 उपांत्य सामना 2मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना 3 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेबाहेर फेकले. त्यामुळे अंतिम सामना खेळण्याचे आफ्रिकेचे स्वप्न पुन्हा एकदा तुटले. या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांची प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे. त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याविषयी म्हटले की, आता त्यांना अंतिम सामना कोण जिंकतो, याने काहीही फरक पडत नाही.
काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात (World Cup 2023 Semi Final 2) ऑस्ट्रेलिया संघाकडून दारुण पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर (Rob Walter) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विश्वचषक 2023 अंतिम सामना पाहण्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, “प्रामाणिकपणे सांगतो, मी अंतिम सामना पाहण्याची शक्यता 1 टक्के आहे. आणखी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला काहीही फरक पडत नाही (कोण जिंकते याने).”
भारताविषयी मोठे विधान
भारतीय संघाविषयी बोलताना ते म्हणाले की, “यजमान संघाने विश्वचषक जिंकणे खूपच चांगली बाब आहे. मागील 8 आठवड्यात आपण पाहिले आहे की, भारतीय संघाला कशाप्रकारचे समर्थन मिळत आहे. तसेच, तो स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे.”
दक्षिण आफ्रिकेचा पराभव
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 49.4 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत फक्त 212 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा या डेविड मिलर याने केल्या. त्याने 116 चेंडूंचा सामना करताना 101 धावांची खेळी केली. यात 5 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 14 चेंडू शिल्लक ठेवत 7 बाद 215 धावा केल्या. तसेच, सामना 3 विकेट्सने जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. (i dont care who wins world cup final south africa head coach rob walter after losing to australia cwc 2023 semi final 2)
हेही वाचा-
World Cup 2023 Final पूर्वी मिचेल मार्शची रोहितसेनेला धमकी! म्हणाला, ‘2 बाद 450 धावा करून भारताला…’
‘त्या दीड तासादरम्यान मी खूपच घाबरलेलो, पण…’, INDvsNZ Semi Finalविषयी ‘थलायवा’ रजनीकांत काय म्हणाले?