---Advertisement---

‘हिटमॅन’ रोहित शर्माने केलेला हा खास ट्विट होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल…

---Advertisement---

3 ऑगस्टपासून भारताचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा सुरु होण्याआधी रोहित शर्मा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू विराटने 29 जूलैला पत्रकार परिषदेत त्या दोघांमध्ये कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यानंतर आता भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहितने बुधवारी(31 जूलै) खास ट्विट केला आहे. त्याचा हा ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

रोहितने फलंदाजीसाठी मैदानात येतानाचा त्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेच ट्विट केले आहे की ‘मी फक्त माझ्या संघासाठीच नाही तर देशासाठी मैदानात उतरतो.’

रोहितला या वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी20 आणि वनडे बरोबरच कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये जवळ जवळ 1 वर्षाने पुनरागमन करण्याची संधी आहे. त्याने भारताकडून शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2018 ला खेळला आहे.

तसेच रोहित या दौऱ्यात भारतीय संघाचे टी20 आणि वनडे मालिकेत उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स संघात झाली या खेळाडूंची अदला-बदली

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा इंग्लंड संघ, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

आजपासून सुरु होणाऱ्या ऍशेसबद्दल सर्वकाही…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment