एकेकाळी कर्णधार एमएस धोनी आणि हरभजन सिंगची जोडी सुपरहिट होती. ऑफस्पिनर हरभजनने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले. तो बराच काळ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. भज्जी आणि धोनी 2007 टी20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कपमध्ये एकत्र खेळले होते. नंतर दोन्ही खेळाडू चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळले. मात्र, आता भज्जीने मोठा खुलासा केला आहे. हरभजनने सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून मी एमएस धोनीशी बोललो नाही. मात्र यामागचे कारण काय? हे त्यांनी सांगितले नाही.
मात्र, एक मात्र नक्की की 2011 च्या विश्वचषकानंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना फारशी संधी मिळाली नाही. 2015 पर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली होती. भज्जी आणि युवराज दोघेही पंजाबसाठी एकत्र खेळले आहेत आणि दोघांनाही चांगली वागणूक दिली जात नसल्याची चर्चा अनेकदा झाली आहे. आता भज्जीने एमएस धोनीसोबतच्या संभाषणावर मोठा दावा केला आहे.
मीडियाशी हरभजन सिंग म्हणाला, “नाही, मी धोनीशी बोलत नाही. मी जेव्हा सीएसकेमध्ये खेळायचो तेव्हा आम्ही बोलायचो, पण त्याशिवाय आम्ही कधीच बोललो नाही. या गोष्टीला 10 वर्षे झाली आहेत. मला माहित नाही की काय कारण आहे. आम्ही जेव्हा आयपीएल खेळत होतो तेव्हा केवळ मर्यादित मैदानावर बोलत होते”.
भज्जीने पुढे सांगितले की, सध्या तो युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांच्याशी नियमित बोलतो. धोनीबाबाबत हरभजन पुढे म्हणाला की, “माझ्या मनात त्याच्याविरुद्ध काही नाही. जर त्याला काही बोलायचे असेल तर तो मला फोन करु शकतो. मी देखील त्याला कधी फोन करण्याचे प्रयत्न केले नाही. मी त्यांनाच फोन करतो जे माझे फोन उचलतात आणि बोलतात. मी त्यांच्यांच संपर्कात आहे. जे माझे चांगले मित्र आहेत. दोघांमधील संबंध हे नेहमी घेवाण आणि देवाणमध्ये असतं. जर मी तुमचा आदर करतो, तर तुम्हीही माझा आदर कराल अशी माझी अपेक्षा आहे”.
हेही वाचा-
ॲडलेड ‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी दणाणले, ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची हवा
‘लोकांनी पृथ्वी शॉची सचिनशी तुलना करून चूक केली, त्यानी आता विराट कोहलीकडून प्रेरणा घ्यावी’
15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या संघानं वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकला, मालिका बरोबरीत