---Advertisement---

विराट कोहलीनंतर ‘हा’ खेळाडू करू शकतो भारतीय संघाचे नेतृत्व; माजी दिग्गजाने सांगितले नाव…

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 11:06 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने विराट कोहलीनंतर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होऊ शकेल, यावर भाष्य केले आहे. विराटनंतर केएल राहुल हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल असा विश्वास आकाश चोप्राला आहे. पण त्यासाठी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात तो किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व कसे करतो, हे पाहावे लागेल. आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होईल. यावेळी राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून गेल्या दोन वर्षांत राहुलने शानदार फलंदाजी केली. मागील हंगामातील पंजाब संघाचा कर्णधार आर अश्विन दिल्ली कॅपिटल्सकडे गेल्याने राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपविले आहे. कोव्हिड -19 साथीच्या आजारामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला अद्याप आयपीएलचे कोणतेही विजेतेपद मिळवता आले नाही. आपल्या कर्णधारपदाच्या आणि फलंदाजीच्या बळावर, या हंगामात राहूल संघ किती पुढे नेण्यास सक्षम आहे, हे पाहणे बाकी आहे.

फेसबुक पेजवर त्याला एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश म्हणाला, ”मला आशा आहे की, त्याची आयपीएलमधील ‘कॅप्टन्सी’ चांगली होईल. खरं तर त्याच्या कर्णधारपदाची कल्पना येईल, त्याने खेळामध्ये प्रगती कशी केली, कोणत्या प्रकारचे धोरण अवलंबले. जर आपण विराट आणि रोहित (शर्मा) कडे पाहिले तर दोघेही एकाच वयोगटातील आहेत. एक वेळी अशी येईल आणि तुम्हाला असेही वाटू शकते की आता त्यांच्यात कर्णधारांची गोष्ट नाही.”

“विराट जेव्हा संघातून बाहेर राहतो, तेव्हा रोहितला त्याच्या जागी कर्णधार बनवले जाते. येणार्‍या काळात परिस्थिती बदलू शकते. धोनीच्या काळात कर्णधार म्हणून विराट सज्ज होता, पण सध्याच्या काळात जर तुम्ही पुढच्या कर्णधाराचा विचार कराल, तर तुम्ही कुण्या दुसऱ्या खेळाडूच्या नावाचा विचार कराल,” असेही आकाश चोप्राने सांगितले.

त्याचबरोबर आकाशचा असा विश्वास आहे की, 28 वर्षीय राहुल विराटनंतर तो भारताचा कर्णधार बनू शकतो. तो पुढे म्हणाला, ”अशी वेळ येते की जेव्हा तुम्हाला दुसर्‍या एखाद्याला बॅटन द्यावी लागेल, जसे एमएस धोनीने विराटला दिले तसेच विराटही दुसर्‍या कोणाला देईल. जेव्हा तो असे करतो तेव्हा राहुल या ओळीतील पुढचा खेळाडू असू शकतो. तर, मला वाटते की या आयपीएलमधून राहुल कर्णधार म्हणून चांगले काम करील. तो एक चांगला कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

-कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना

-माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’

-एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित

ट्रेंडिंग लेख-

-सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार

-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश

-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---