fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार

The Story of Indian Cricketer Nikhil Naik

September 15, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

Photo Courtesy: Twitter/ KKRiders


त्याला पाहिले की, तुम्हाला अफगाणिस्तानचा अहमद शहजाद आठवल्याशिवाय राहणार नाही. जवळपास तितकीच उंची…काहीसा तसाच पोटाचा घेर…तोदेखील यष्टीरक्षक आणि हादेखील यष्टीरक्षक…तोसुद्धा पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात करतो आणि हा देखील पहिल्या चेंडूपासून आपली बॅट फिरवतो… तो अहमद शहजाद आहे तर हा महाराष्ट्राचा पठ्ठ्या निखिल नाईक आहे..

सिंधुदुर्गातील सावंतवाडीचा असलेला निखिल शंकर नाईक सलग दुसऱ्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात यावेळी यूएईमधील मैदाने गाजवायला त्याने कंबर कसली आहे.

निखिलला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड. ज्यावेळी क्रिकेट जगतात एमएस धोनीने पाऊल ठेवले त्यावेळी निखिल फक्त दहा वर्षाचा होता. धोनीचे यष्टिरक्षण व तुफानी फलंदाजी याचा लहानग्या निखिलवर असा काही प्रभाव पडला की, त्याने यष्टिरक्षक फलंदाज होण्याचे निश्चित केले. सावंतवाडी सारख्या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये त्याने अनेक लहान-लहान स्पर्धा गाजवल्या. टेनिस क्रिकेट सोडून तो स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाला. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीमुळे, त्याची निवड महाराष्ट्राच्या १५ वर्षाखालील संघात झाली.

क्रिकेट कारकीर्द आता कुठे सुरू व्हायला लागली होती‌ अशातच त्याला एक जबर धक्का बसला.‌ २०१० मध्ये त्याच्या आईचे पक्षघातामुळे निधन झाले. निखिलचे वडील मच्छिमारी करत. आई गेली तरी वडिलांनी निखिलला क्रिकेट खेळण्यापासून रोखले नाही व त्याला आवश्यक ती सर्व मदत करत राहिले.

कोणत्याही क्रमांकावर येऊन जलदगतीने धावा काढण्याच्या व यष्ट्यांमागील चपळता या कौशल्यांमुळे २०१४ च्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली. पहिल्याच स्पर्धेत चार सामन्यात ५८.५० च्या अफलातून सरासरीने २३४ धावा फटकावत निखिलने आपली निवड सार्थ ठरवली.

२०१६ आयपीएल लिलावात इलेव्हन पंजाब संघाने २० लाख रुपयांची बोली लावत अनपेक्षितपणे त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्याला पंजाबने अवघ्या दोन सामन्यात संधी दिली, ज्यात निखिलने २२ धावा काढल्या. आयपीएलनंतर देखील, निखिल महाराष्ट्राच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य होता.

२०१७ व २०१८ अशी दोन वर्ष आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. २०१९ मधील आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी दिनेश कार्तिकसाठीचा पर्यायी यष्टिरक्षक म्हणून केकेआरने त्याचा समावेश आपल्या संघात केला. आयपीएलमध्ये, निवडले गेल्याचा आनंद त्याने त्या वर्षीची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवून साजरा केला. ११ सामन्यात ६४.३३ च्या विस्मयकारी सरासरीने १९४ धावा तडकावल्या.

या स्पर्धेदरम्यान रेल्वे विरुद्धच्या सामन्यात निखिलने, ५८ चेंडूत चार चौकार व आठ गगनचुंबी षटकारांचा सहाय्याने ९५ धावा ठोकल्या. डावाच्या अखेरच्या षटकात, वेगवान गोलंदाज अमित मिश्राला त्याने सलग पाच षटकार मारले. २०१९ आयपीएलमध्ये सुनील नरीन दुखापतग्रस्त झाल्याने, दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने केकेआरसाठी सलामीवीराची भूमिका वठवत पदार्पण केले.

कोलकाता यावर्षी आपले तिसरे आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने युएईतील मैदानांवर उतरेल. यावर्षी “इंडियन रसेल” या टोपणनावाने केकेआरच्या संघात ओळखल्या जाणाऱ्या, निखिलला पुरेशी संधी मिळाल्यास, तो आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

वाचा-

-‘त्या’ भावासाठी धावून आली बहीण! आता आयपीएल गाजवून देणार भाऊबीजेची खास भेट

-बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज

-एमएस धोनीशी तुलना केली जाणारा पठ्या गाजवणार आयपीएल; करतोय स्मिथच्या राजस्थानकडून एंट्री


Previous Post

माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’

Next Post

कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना

Related Posts

क्रिकेट

अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना

Photo Courtesy: Twitter/IPL

इतर संघांच्या तुलनेत पारडं जड असूनही मुंबई इंडियन्स संघ चिंतेत; पहा काय आहे कारण

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

...आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रांचीच्या त्या खेळाडूने केली क्रिकेट खेळायला सुरुवात

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.