इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या परंपरेनुसार दरवर्षी स्पर्धेची सुरुवात होण्यापुर्वी खेळाडूंचा लिलाव पार पडतो. या लिलावात फ्रंचायझी बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देत आपल्या संघात भरती करतात. नेहमीप्रमाणे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलावही डिसेंबर २०१९मध्ये पार पडला. त्यावेळी फ्रंचायझींनी बऱ्याच युवा खेळाडूंची संघात निवड केली.
आयपीएलच्या एका फ्रंचायझीमध्येही एक जबरदस्त युवा भारतीय खेळाडू उपलब्ध आहे, ज्याला चाहते कदाचितच ओळखत असतील. हा खेळाडू दमदार फलंदाजी करण्यासह यष्टीरक्षण करण्यातही माहीर आहे. त्याने दिल्ली संघाला आपल्या जोरदार प्रदर्शनाच्या बळावर कित्येक सामने जिंकून दिले आहेत. हाच खेळाडू आता आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाकडून विक्रमतोड प्रदर्शन करण्यास सज्ज झाला आहे.
हा खेळाडू म्हणजे, ‘अनुज रावत’. १७ ऑक्टोबर १९९९ रोजी उत्तराखंडच्या रामनगरमध्ये अनुजचा जन्म झाला होता. २० वर्षीय अनुजने अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलेले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे.
अनुजची आकडेवारी पाहिली तर, एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, अनुज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार प्रदर्शन करु शकतो. त्याने आतापर्यंत दिल्लीकडून १९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके ठोकत ९२५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक १३४ धांवाचाही समावेश आहे.
तर, अ दर्जाच्या आणि देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचाही अनुभव आहे. त्याची अ दर्जाच्या क्रिकेटमधील फलंदाजी सरासरी ३५.७१ इतकी आहे तर टी२० क्रिकेटमधील २६.११ इतकी आहे.
अनुजची चपळता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. यष्टीमागे त्याचे हात खूप वेगाने चालतात. त्यामुळे त्याच्या यष्टीरक्षणाची तुलना भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनीबरोबर केली जाते. अशा गुणवान यष्टीरक्षक फलंदाजाला आपल्या संघात खरेदी करण्यासाठी कोणता संघ नाही म्हणेल?
आयपीएल २०२० लिलावात अनुजला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये कडी टक्कर झाली होती. सुरुवातीला फ्रंचायझींनी अनुजसाठी बेसिक २० लाख रुपयांपासून सुरुवात केली होती. पुढे त्याची बोली वाढत गेली आणि अखेर राजस्थान रॉयल्सने त्याला ८० लाख रुपयांना विकत घेतले. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीला तो हाताने घट्ट पकडत आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल.
विशेष म्हणजे, अनुजची क्रिकेट कारकिर्द घडवण्यात भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा मोठा हात आहे. गंभीरमुळे त्याला दिल्ली क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. एवढेच नव्हे तर, गंभीरने अनुजला स्लिपमध्ये उभे राहून यष्टीरक्षणाचे टिप्सदेखील दिले आहेत.
गंभीरने अनुजला सल्ला दिला होता की, “जेव्हा एखादा यष्टीरक्षक पुढील गोलंदाजाला चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकत नाही, तेव्हापर्यंत तो यष्टीमागे एकही चेंडू पकडू शकणार नाही.” गंभीरच्या या सल्ल्यामुळे अनुजला एक उत्कृष्ट यष्टीरक्षक बनण्यात मदत झाली.
ट्रेंडिंग लेख –
सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज
बीडमधील आंबेजोगाईचा भीडू आयपीएल गाजवायला झालाय सज्ज
यंदाचा आयपीएल हंगाम गाजवू शकतात हे ५ दिग्गज सलामीवीर
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या खेळपट्टीवर चक्क डान्स करताना दिसला विराट कोहली; पहा व्हिडिओ
शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही
आयपीएल२०२० साठी राजस्थान रॉयल्सने ‘या’ दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी