fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश

September 15, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे सामने युएईमधील तीन शहरांत होणार आहे.

याआधी २०१४ च्या आयपीएल मोसमाचे २० सामने युएईमध्ये झाले होते. आता पुन्हा एकदा संपुर्ण आयपीएल मोसमच आयोजित करण्यासाठी युएई सज्ज आहे.  या लेखात आयपीएलमधील त्या ४ संघांचा आढावा घेतला आहे, जे युएईमध्ये आयपीएल झाल्याने फायदा होऊन प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात अर्थात साखळी फेरीनंतर अंतिम ४ संघात राहू शकतात.

१. चेन्नई सुपर किंग्स – 

आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी संघांमधील एक संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील असा एकमेव संघ आहे, ज्यांनी खेळलेल्या सर्व आयपीएल मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच चेन्नईचा संघ आत्तापर्यंत सर्वाधिक ८ वेळा  अंतिम सामन्यात पोहोचला आहे आणि ३ वेळा त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

आता आयपीएल २०२० जर युएईला झाले तर चेन्नई सुपर किंग्ससाठी फायदा असा की युएईची मैदाने फिरकी गोलंदाजीला अनुकुल आहेत. चेन्नईकडे हरभजन सिंग, इम्रान ताहिर, पियुष चावला, मिशेल सँटेनर, रविंद्र जडेजा सारखे आंतरराष्ट्रीय स्थरावर चमकलेले दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. तसेच वेगवान गोलंदाजीमध्येही चेन्नईकडे जोस हेझलवूड, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, सॅम करन, लुंगी एन्गिडी आहे.

याव्यतिरिक्त चेन्नईकडे फलंदाजीमध्येही सुरेश रैना, शेन वॉट्सन, फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड असे फलंदाज आहेत. तर एमएस धोनीसारखा यष्टीरक्षक-कर्णधारही आहे. त्यामुळे संघाची संघबांधणी पाहता चेन्नईकडे कोणत्याही खेळपट्टीवर खेळू शकणारे खेळाडू असल्याने ते पुन्हा एकदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकतात.

२. मुंबई इंडियन्स –

आयपीएलमध्ये सर्वाधिक ४ विजेतेपद जिंकणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सच्या संघाने आत्तापर्यंत अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या ४ वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसे पाहिले तर आयपीएलमध्ये मुंबईसाठी युएईमध्ये खेळण्याचा अनुभव मात्र तसा बरा नाही. कारण २०१४ ला झालेल्या युएईत त्यांनी खेळलेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

पण असे असले तरी यावेळी मुंबईकडे युएईमध्ये यशस्वी होऊ शकणारे आणि अनुभवी खेळाडू आहेत. मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यष्टीरक्षक इशान किशन, आदित्य तरे, ख्रिस लिन, क्विंटॉन डी कॉक सारखे फलंदाज आहेत. तर हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्डसारखे चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत.

याबरोबरच यावेळी जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल, लसिथ मलिंगा, धवल कुलकर्णी असे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत आणि राहुल चाहर, कृणाल पंड्या हे फिरकी गोलंदाजही आहेत. असे असले तरी मुंबईला अनुभवी फिरकी गोलंदाजांची थोडीफार कमतरता भासू शकते. पण तरीही त्यांच्याकडे असलेल्या क्षमतेच्या जोरावर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतात.

३. सनरायझर्स हैद्राबाद – 

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैद्राबाद संघानेही मागील अनेक मोसमात सर्वांना प्रभावित केले आहे. २०१३ ला सनरायझर्स हैद्राबाद हा नवीन संघ आयपीएलमध्ये सामील झाला. त्यांनी पहिल्या मोसमापासूनच चांगली कामगिरी केली. २०१६ पासून त्यांनी प्रत्येक मोसमात अंतिम ४ संघांमध्ये स्थानही मिळवले. त्यांना केवळ २०१४ आणि २०१५ या २ मोसमात अंतिम ४ संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे त्यांनी २०१६ ला डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे.

२०२० साठी सनरायझर्स संघाचा विचार करायचा झाल्यास त्यांच्याकडे वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, प्रियम गर्ग असे फलंदाज आहेत. तर गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी, राशिद खान यांचे फिरकी आक्रमण आहे, तर जोडीला शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, विजय शंकर हे गोलंदाजही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही यावेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता आहे.

४. दिल्ली कॅपिटल्स – 

२०१९ च्या मोसमात सर्वांना प्रभावित करणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीचा सध्याचा संघ हा युवा खेळाडूंचा संघ म्हणून ओळखला जातो. या संघाचे नेतृत्वही युवा फलंदाज श्रेयस अय्यरकडे आहे. शिवाय त्याच्या जोडीला पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर हे युवा फलंदाजही आहेत. तसेच अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जेसन रॉय, ऍलेक्स कॅरे सारखे अनुभवी फलंदाज आहेत. तर मार्कस स्टॉयनिस हा अष्टपैलू खेळाडू आहे.

एवढेच नाही तर या मोसमासाठी दिल्लीच्या संघात आर अश्विन हा अनुभवी फिरकी गोलंदाजही सामील झाला आहे. त्याच्या जोडीला अक्षर पटेल, अमित मिश्रा, संदिप लामिछाने हे गोलंदाज असतील. तर इशांत शर्मा, कागिसो रबाडा, ख्रिस वोक्स, मोहित शर्मा, असे गोलंदाजही आहेत. त्यामुळे दिल्ली संघातील युवा खेळाडूंची क्षमता पहाता त्यांनाही २०२० च्या आयपीएल मोसमात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची चांगली संधी आहे.

ट्रेंडिंग लेख –

२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच

धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी

या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे गेल्याने होणार फायदा


Previous Post

आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…

Next Post

माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

माजी दिग्गज म्हणतो, 'जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने...'

Photo Courtesy: Twitter/ KKRiders

सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार

Photo Courtesy: Twitter/ BCCI

कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.