आयपीएलचा ‘मिलीयन डॉलर बेबी’ म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यावर्षी विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा सदस्य आहे. यापूर्वी तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघाचा सदस्य राहिला होता. यंदा आरसीबीसाठी खेळत असताना त्याची कामगिरी चांगली होतेय. त्याच वेळी मॅक्सवेलने आरसीबी संघाविषयी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
प्रशिक्षक आणि खेळाडू मला..
आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ग्लेन मॅक्सवेलने आरसीबी संघाविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “वानखेडे स्टेडियममधील परिस्थिती काही वेगळी आहे. येथे बरेच मोठ्या धावसंख्येचे सामने खेळले गेले आहेत. त्यामुळे आमच्या फलंदाजांसाठी ही चांगली गोष्ट आहे की, आम्ही येथे बऱ्याच धावा करू शकतो. आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून असे दिसते की, मी माझ्या घरात आहे. प्रशिक्षक खूप मदत करतात आणि खेळाडूंचाही पाठिंबा आहे. मला इथे खूप मजा येत आहे.”
आरसीबीने हंगामातील आपले पहिले तीन सामने चेन्नई येथे खेळले. या तिन्ही सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्ध २२ एप्रिल रोजी त्यांचा चौथा सामना मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे मॅक्सवेल
आयपीएल २०२० मधील निराशाजनक कामगिरीनंतरही मॅक्सवेलला आरसीबीने १४ कोटींची बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले. मॅक्सवेलने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत, पहिल्या तीन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. दोन अर्धशतकांसह त्याने तीन सामन्यात १७६ धावा ठोकल्या आहेत. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सोबत मिळून तो संघासाठी मोठ्या धावसंख्या बनवताना दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?