प्रतिष्ठित टी20 लीग आयपीएल 2023 स्पर्धेत जिथे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले, तिथे नव्या दमाचे युवा खेळाडू समोर आले. त्यापैकीच एक म्हणजे शुबमन गिल होय. गुजरात टायटन्स संघाचा हुकमी एक्का असलेल्या गिल याने आयपीएलच्या 16व्या हंगामात विरोधी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. अशात त्याने त्याच्या कौतुकास्पद प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी (दि. 26 मे) दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) संघात खेळला गेला. या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) याने मुंबईविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. सामन्यानंतर त्याने सांगितले की, त्याने असे कोणते बदल केले, ज्यामुळे तो सातत्याने धावांचा पाऊस पाडत आहे. गिलने यामागील एक मोठे कारणही सांगितले. तो म्हणाला की, टी20 विश्वचषकानंतर त्याने त्याच्या पद्धतीत बदल केले होते.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत गिलने मुंबईविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शतक झळकावले. त्याने यावेळी 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 129 धावांची लाजवाब खेळी केली. त्यामुळे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 233 धावा चोपल्या.
‘ही माझ्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी’
गिलने सांगितले की, जेव्हा टी20 विश्वचषक स्पर्धे संपली होती, तेव्हा त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आपल्या पद्धतीत बदल केला होता. तो म्हणाला की, “मी माझ्या खेळावर काम करत आहे. मी टी20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी काही गोष्टींमध्ये सुधारणा केली. तसेच, तंत्रातही बदल केले. मैदानाबाहेर तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात, पण मैदानात तुम्हाला संघासाठी जितके योगदान देता येईल, तेवढे द्यायचे असते. मला वाटते की, ही माझ्या आयपीएल कारकीर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती.”
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही गिलचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, “शुबमन गिल याच्याकडे जी गुणवत्ता आणि आत्मविश्वास आहे, तो शानदार आहे. आजची त्याची ही खेळी, त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती आणि तो कधीच घाईत दिसला नाही. आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तो सुपरस्टार खेळाडू ठरेल.”
गिलचा विक्रम
गिलने या सामन्यात 129 धावांसह खास विक्रमही नावावर केला. तो आयपीएल 2023मधील सर्वाधिक धावा करणारा अव्वल फलंदाज बनला. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 16 सामन्यात 60.79च्या सरासरीने 851 धावा केल्या. यामध्ये 3 शतकांचा समावेश होता. तो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक शतके करणारा विराट कोहली (4 शतके) आणि जोस बटलर (4 शतके) यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला.
आता गुजरातला आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यातही गिलकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (i have made technical changes after t20 world cup says gt match winner shubman gill ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : अबू धाबीतील खास सोहळ्यासाठी पृथ्वी शॉने गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, सर्वत्र रंगलीय चर्चा
आयपीएल हंगामातून बाहेर पडल्यानंतर मुंबईला आठवला जसप्रीत बुमराह; आर्चरचं नाव घेत प्रशिक्षक म्हणाले…