इंडियन प्रीमियर लीग 2023 चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने या सामन्यात पुन्हा एकदा आपला शानदार खेळ दाखवला. त्याने मुंबईची गोलंदाजी फोडून काढत अवघ्या 49 चेंडूवर हंगामातील आपले तिसरे शतक पूर्ण केले.
आयपीएल 2023 मध्ये गिल सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. गुजरातसाठी त्याने नेहमीच दमदार कामगिरी केली. त्याने गुजरातच्या घरच्या मैदानावर झालेल्या आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात त्याने शतक झळकावून आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केलेले. त्यानंतर अखेरच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध देखील त्याने हाच फॉर्म कायम राखत नाबत शतक ठोकले. पहिल्या क्वालिफायरमध्ये तो अपयशी ठरला होता. मात्र, या सामन्यात तो पुन्हा एकदा चमकला.
त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. अवघ्या 22 चेंडूंमध्ये त्याने या हंगामातील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवघे 17 चेंडू लागले. बाद होण्यापूर्वी त्याने केवळ 60 चेंडूंमध्ये 129 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता. या खेळीसह त्याने या हंगामात ऑरेंज कॅप देखील आपल्या डोक्यावर सजवली.
(Gujarat Titans Shubman Gill Hits 3rd Century In IPL 2023 Qualifier 2 Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी । रॅपर किंग-डिवाइनसह हे मोठे कलाकार लावणार हजेरी
ब्रेकिंग! मुंबई विरुद्ध गुजरात सामना रद्द? गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार, वाचा धक्कादायक माहिती