दिल्ली कॅपिटल्स इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला. दिल्लीच्या खराब प्रदर्शनासोबतच संघातील एका खेळाडूनेही निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोडही उडाली. आता तोच खेळाडू शुक्रवारी (दि. 26 मे) अबू धाबी येथे आयोजित केलेल्या 23व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्यात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पोहोचला. विशेष म्हणजे, तो सार्वजनिक ठिकाणी गर्लफ्रेंडसोबत पहिल्यांदाच दिसला. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आहे. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
पृथ्वी शॉ गर्लफ्रेंड निधी तपाडिया (Prithvi Shaw Girlfriend Nidhi Tapadia) हिच्यासोबत आयफा पुरस्कार (IIFA Awards) सोहळ्यात पोहोचला होता. त्यांचा व्हिडिओ एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पृथ्वी शॉ आणि निधी तपाडिया (Prithvi Shaw And Nidhi Tapadia) एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओत पृथ्वीने काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली आहे. तसेच, त्याची गर्लफ्रेंड निधी तपाडिया (Nidhi Tapadia) हिनेही काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. दोघांनीही आयफाच्या हिरव्या कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोझही दिल्या.
आयपीएल 2023मध्ये पृथ्वीची निराशाजनक कामगिरी
पृथ्वी शॉ याच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. यादरम्यान तो खराब फॉर्ममध्ये दिसला. त्याला काही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर काढले गेले. तो संपूर्ण हंगामात फक्त 1 अर्धशतक करण्यात यशस्वी ठरला. तो सातत्याने धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्याने 8 डावांमध्ये फक्त 106 धावा केल्या. यादरम्यान त्याने 13.25च्या सरासरीने आणि 124.70च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तो दोन डावांमध्ये खातेही उघडू शकला नाही. तसेच, त्याला अनेक डावांमध्ये दहाचा आकडाही गाठता आला नव्हता.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी आयपीएल 2023 (IPL 2023) खूपच खराब हंगाम ठरला. संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून सर्वात पहिल्यांदा बाहेर पडला. अपघातामुळे नियमित कर्णधार असलेला रिषभ पंत मैदानापासून दूर होता. अशात ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर याने कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. मात्र, संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले. संघाने 14 सामने खेळले. त्यापैकी फक्त 5 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. तसेच, गुणतालिकेत ते नवव्या स्थानी राहिले. (cricketer prithvi shaw and his girlfriend nidhi tapadia come together at iifa 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल हंगामातून बाहेर पडल्यानंतर मुंबईला आठवला जसप्रीत बुमराह; आर्चरचं नाव घेत प्रशिक्षक म्हणाले…
सामना गमावूनही सूर्यकुमारने मन जिंकले! सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एन्ट्री