---Advertisement---

‘मी या निर्णयाचा..’ टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडल्यानंतर शुबमन गिलने अखेर सोडलं मौन!

On: शनिवार, जानेवारी 10, 2026 5:37 PM
---Advertisement---

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शुबमन गिल (Shubman gill) खेळताना दिसणार नाही. आशिया कप 2025 मध्ये त्याला भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला. वर्ल्ड कपच्या संघात जागा न मिळाल्याने गिलने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वनडे कर्णधार शुबमन गिल बोलत होता. टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याबद्दल तो म्हणाला, मी निवड समितीच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. टी-20 वर्ल्ड कपसाठी मी भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

यावेळी गिलने विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्माचेही कौतुक केले. तो म्हणाला, रोहित भाई इतिहासातील सर्वात उत्तम सलामीवीरांपैकी एक आहेत, तर विराट भाई वनडे क्रिकेटमधील जगातील महान फलंदाज आहेत.

न्यूझीलंडविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. दुखापतीमुळे गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता, पण आता न्यूझीलंडविरुद्ध तो पुनरागमन करत आहे. या मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---