दुबई येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने बाजी मारत पाचव्यांदा किताब पटकावला. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या चुकीमुळे सूर्यकुमार यादव आपली विकेट गमावून बसला. आता रोहितने याविषयी मोठे विधान केले आहे.
कसा झाला सूर्यकुमार बाद?
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि सूर्यकुमार चांगली भागिदारी करत संघाचा डाव पुढे नेत होते. अशात डावातील ११वे षटक टाकण्यासाठी दिल्लीचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन आला. त्याच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर रोहित आणि सूर्यकुमार एकही चौकार किंवा षटकार लगावू शकले नाहीत.
शेवटी रोहितने पाचव्या चेंडूवर एक साधारण शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. परंतु नॉन स्ट्राईकर बाजूला असलेला सूर्यकुमार त्याला धाव घेऊ नको म्हणून सांगत होता. तरीही रोहित पळाला आणि धाव घेण्याच्या भाबड्या गोंधळात प्रविण दुबे आणि रिषभ पंतच्या हातून सूर्यकुमार धावबाद झाला. त्यामुळे पूर्ण हंगामात कमालीची फलंदाजी केलेल्या सूर्यकुमारला हंगामाचा गोड शेवट करता आला नाही.
रोहित शर्माचे वक्तव्य
सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात बोलताना रोहितने याविषयी आपले मत मांडले. तो म्हणाला की, “सूर्यकुमार खूप समझदार खेळाडू आहे. ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये तो होता, ते पाहता मला वाटते की मी अंतिम सामन्यामध्ये माझ्या विकेटचे बलिदान द्यायला पाहिजे होते. असे असले, तरीही पूर्ण हंगामात त्याने शानदार फटकेबाजी केली आहे.”
अंतिम सामन्यातील रोहित-सूर्यकुमारची आकडेवारी
धाव घेण्याच्या गोंधळात सूर्यकुमार केवळ २० चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत १९ धावांवर पव्हेलियनला परतला. पण रोहितने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने केवळ ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब चपला धुवत असताना विराट कोहली कॅमेरात कैद; अनुष्का म्हणाली, ‘दौऱ्यावर जाण्या अगोदर…’
प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेत्रीसोबत डेविड वॉर्नरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
आयपीएल २०२१: किंग्ज इलेव्हन पंजाब संघ ‘या’ खेळाडूची करणार हाकालपट्टी?
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम






