इंडियन प्रीमियर लीग २०२०चा महासंग्राम संपला आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईत झालेल्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ५ विकेट्सने मात दिली. यासह तब्बल पाचव्यांदा विजेता ठरण्याचा बहुमान मुंबईने पटकावला आहे. आता काही दिवसांमध्ये युएईत असलेला भारतीय संघ येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची चर्चा रंगली आहे.
अनुष्काने शेअर केला विराटचा फोटो
झाले असे की, विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर विराटसंदर्भात स्टोरी ठेवली होती. त्यामध्ये विराट आपले शूज धुताना दिसला. अनुष्काने विराटच्या फोटोला कॅप्शन देत लिहिले की, ‘ऑस्ट्रलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी माझ्या पतीला त्याचे शूज धुताना रंगेहाथ पकडले आहे.’
https://twitter.com/adityakumar480/status/1326469517485039616?s=20
विराट कोहली तीन कसोटी सामन्यांना मुकणार
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका होईल. परंतु भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट लवकरच वडील होणार असल्यामुळे मायदेशात परतणार आहे. त्यामुळे तो वनडे आणि टी२० मालिकेत खेळताना दिसेल. परंतु, १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो भारतात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: किंग्ज इलेव्हन पंजाब संघ ‘या’ खेळाडूची करणार हाकालपट्टी?
दिल्लीने मुंबईला हिरा दिला हिरा! ‘या’ हुकमी गोलंदाजावर रोहित शर्माने केला कौतुकाचा वर्षाव
टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू उतरणार विशेष जर्सीत, कारण आहे खूप खास
ट्रेंडिंग लेख-
मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप