चेम्सफोर्ड | २५ ते २७ जुलै या दरम्यान कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना पार पडला.
या सराव सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करणारा २४ वर्षीय पॉल अल्टर सध्या जगातला सर्वात आनंदी गोलंदाज आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पॉल अल्टरने याचा खुलासा केला.
“मी जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असलेल्या विराट कोहलीला बाद केले आहे यावर माझा अजुनही विश्वास बसत नाही. सध्याच्या घडीला मी जगातील सर्वात आनंदी गोलंदाज आहे. मी या सामन्यात विराट कोहलीला बाद केल्याची व्हिडिओ क्लिप घेणार आहे आणि ती आयुष्यभर माझ्यापाशी ठेवणार आहे.” असे पॉल अल्टर म्हणाला.
5⃣ Kohli goes for 68 after being caught by Chopra off the bowling of Walter#ESSvIND
Watch live here: https://t.co/0WMzSvtsrw pic.twitter.com/dHWjS3WwTc
— Essex Cricket (@EssexCricket) July 25, 2018
या सामन्यात भारताने पहिल्या डावात ९ बाद ३९५ धावा केल्या होत्या.
यामध्ये दिनेश कार्तिक ८२ धावा आणि विराट कोहली ६८ धाव यांच्यासह मुरली विजय, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनीही अर्धशतके केली होती.
“I still can’t believe it” @PWalter_22’s reaction to getting the big wicket of @imVkohli today! ????#ESSvIND pic.twitter.com/4CYBypBNe9
— Essex Cricket (@EssexCricket) July 25, 2018
तर एसेक्सने पहिला डाव ८ बाद ३५९ वर घोषित केला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात २ बाद ८९ धावा केल्या होत्या.
या अनिर्णित राहिलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी पहिल्या कसोटी सामन्याच्या दृष्टीने सामाधानकारक कामगिरी केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ एडिटेड असल्याचा खळबळजनक गौप्यस्पोट
-तर टीम इंडिया इंग्लंडला इंग्लंडमध्ये लोळवू शकते- ग्लेन मॅकग्राॅ






