जून-जूलैमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात(2019 Worldcup) भारताचे आव्हान उपांत्यफेरीत संपूष्टात आले होते. भारताला न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य सामन्यात 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा पराभव अनेक क्रिकेट चाहते अजूनही विसरलेले नाही.
तसेच या सामन्यात भारताला विजयासाठी केवळ 24 धावांची आवश्यकता असताना यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी(MS Dhoni) धावबाद झाल्याने भारताच्या सामना जिंकण्याच्या आशाही धूसर झाल्या होत्या. त्यावेळी धोनीला बाद झालेले पाहून अश्रू रोखणे कठीण झाल्याचे युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal) म्हटले आहे.
चहलने इंडिया टूडेच्या एका कार्यक्रमात सांगितले की ‘हा माझा पहिला विश्वचषक होता आणि जेव्हा माही भाई बाद झाला तेव्हा मला फलंदाजीला जायचे होते. मी माझे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होतो. मी खूप निराश झालो होतो.’
‘आम्ही 9 सामने चांगले खेळले होते पण अचानक आम्हाला स्पर्धेबाहेर जावे लागले. पाऊस हा काही आमच्या हातात नव्हता त्यामुळे त्याबद्दल बोलणे बरोबर नाही. त्यावेळी पहिल्यांदा आम्हाला शक्य तितक्या लवकर मैदानातून हॉटेलमध्ये जायचे होते.’
या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 92 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत चांगली लढत दिली होती.
मात्र धोनी 50 धावा करुन धावबाद झाला तर जडेजा 77 धावा करुन झेलबाद झाला. त्यांनतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला. त्यामुळे भारताचे या विश्वचषकातील आव्हानही संपूष्टात आले.
या विश्वचषकानंतर भारताच्या टी20 संघात चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आलेली नाही.
याबद्दल चहल म्हणाला, ‘चांगली कामगिरी करणे हे तूमचे काम आहे. जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही चांगली कामगिरी केली. आयपीएलनंतर आमची बेंच स्ट्रेंथही चांगली झाली.’
‘आता जर संघ व्यवस्थापन नवीन प्रतिभेला संधी देत असेल तर हे चांगले आहे. तूम्हाला जाणीव होते की तूमच्यासाठी तिथे स्पर्धा निर्माण झाली आहे आणि तूम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. तूम्ही क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही.’
याबरोबरच चहलने आणखी 5-6 वर्षे क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे की त्याला एक तरी विश्वचषक जिंकायचा आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून श्रीसंत करतो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा तिरस्कार
–२०१८-१९ च्या विजेत्या मुंबईला छत्तीसगडचा दे धक्का!
–एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शिखर धवनने केले मोठे भाष्य…