---Advertisement---

तेव्हा शोएब अख्तर अनुष्काला म्हणाला होता, ‘विराट कर्णधार बनून मोठी चूक करत आहे’

On: शनिवार, जुलै 24, 2021 1:43 AM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखला जातो. अनेकदा याबद्दल त्याच्यावर टीकाही केली गेली आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारतीय संघात स्फूर्तीदायक बदल घडवून आणल्याबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

विराट कसोटीतही नेहमीच विजयाचा विचार करत असतो. तो विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करताना दिसतो. त्याने भारतीय वेगवान गोलंदांजांच्या मानसिकतेही हा बदल केला आहे. याबद्दलही अख्तरने कौतुक केले आहे.

अख्तरने स्पोर्ट्सकिडाशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, “मला वाटते विराटने कर्णधार म्हणून एक उत्कृष्ट काम केले आहे. सोनीवर सुरू असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान मी एकदा अनुष्का शर्माला म्हणालो होतो की ‘मला वाटते विराट कर्णधार बनून चूक करत आहे. मला माहित आहे की त्याच्यावर प्रचंड दबाव होता आणि त्यामुळे तो दबून जाईल.’”

त्याचबरोबर तो पुढे म्हणाला की, “एक अब्जापेक्षाही अधिक लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात सुमारे 20,000 टीव्ही सेट्स आणि चॅनेल्स आहेत, जे त्याची निंदा करण्यास पुरेसे आहेत. माझ्या मनात विचार आला की, ‘तो एक तरुण मुलगा आहे, त्याने धावा करव्यात आणि त्याचा खेळी करावी.’”

विराट आक्रमक होऊन आपल्या वेगवान गोलंदाजांना पाठिंबा देतो
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आता जास्त आनंदित आहे, कारण त्याने विराटबद्दल केला विचार चुकीचा ठरला. तसेच त्याने भारतीय वेगवान गोलंदाजांना पाठिंबा दर्शविल्याबद्दल आणि त्यांच्यात निर्भय वृत्ती तयार करण्याचे श्रेय विराटला दिले. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह नेहमीच विराटच्या आक्रमक वृत्तीबद्दल बोलत असतात.

अख्तर पुढे म्हणाला की “त्याने कर्णधार होण्याचे ते आव्हान स्वीकारले. त्याने वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची प्रतिकृती ओतली आहे. त्याला वेगवान गोलंदाजांमध्ये आपली आक्रमकता बघायची आहे. तो मैदानात विराट कोहली नाही, तो इशांत शर्मा किंवा भुवनेश्वर कुमार किंवा शमीच्या रूपात धावणारा वेगवान गोलंदाज आहे.”

विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारताला यजमान संघाविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटचा ‘तो’ फोटो शेअर करत २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील आठवणींना उजाळा; दिले मन जिंकणारे कॅप्शन

कन्फ्युजन ही कन्फ्युजन! बाद नसतानाही सूर्यकुमार चालू लागला होता तंबूची वाट, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

मोठ्या मनाचा द्रविड! श्रीलंकन कर्णधाराला तिसऱ्या सामन्यात केले मार्गदर्शन, फोटो होतायेत व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---