---Advertisement---

मोठ्या मनाचा द्रविड! श्रीलंकन कर्णधाराला तिसऱ्या सामन्यात केले मार्गदर्शन, फोटो होतायेत व्हायरल

---Advertisement---

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला गेला. यजमान श्रीलंकेने पहिले दोन सामने गमावल्यानंतर या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. मात्र, त्याचवेळी सामन्यादरम्यानचे एक छायाचित्र सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याला काहीतरी सांगताना दिसत आहेत.

मोठ्या मनाचा द्रविड
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. मात्र, २३ षटकानंतर पावसाचे आगमन झाल्याने खेळ तासाभरासाठी थांबवण्यात आला. त्यावेळी भारताची धावसंख्या तीन बाद १४७ झाली होती. पाऊस थांबल्यानंतर मैदानाचे निरीक्षण करण्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे मैदानात उतरले होते. त्याचवेळी श्रीलंकेचा कर्णधार दसूश शनाका हादेखील मैदानात आलेला. द्रविडला पाहताच शनाका त्याच्याशी चर्चा करू लागला. द्रविडने देखील प्रतिस्पर्धी न मानता त्याला काही मार्गदर्शन केले. शनाका द्रविडच्या या सूचना अत्यंत नम्रपणे ऐकत होता.

श्रीलंकेने पलटवली बाजी
पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यावर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अचानकपणे सामन्याचा नूर पालटला. ३ बाद १४७ वरून भारताचा डाव २२५ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर, सोशल मीडियावर नेटकर्यांनी राहुल द्रविडचे कौतुक करण्यास सुरुवात केली.

शनाकाचा आपल्याच प्रशिक्षकाशी झालेला वाद
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आघाडीवर असताना देखील श्रीलंका संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर चांगलेच संतप्त झाले होते. भर मैदानात झालेल्या या वादाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे, चाहते आर्थर व द्रविड यांच्या प्रशिक्षणाची तुलना करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताने २१ व्या स्थानी केले ऑलिम्पिक उद्घाटनात संचलन; ‘या’ आगळ्यावेगळ्या नियमानुसार ठरते संचलनातील देशांची क्रमवारी

रहाणे, मंकड यांच्या पंक्तीत बसला सॅमसन; अर्धशतक हुकल्यानंतरही झाला ‘हा’ विक्रम नावावर

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने केले आचरेकर सरांना वंदन, शेअर केला भावनिक व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---