---Advertisement---

‘मला नोकरासारखी वागणूक द्यायचे…’, वसीम अक्रमकडून दिग्गजावर मोठे आरोप

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 11:15 PM
Wasim-Akram
---Advertisement---

पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी मोठा खुलासा केला आहे. अक्रम पाकिस्तान संघाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज राहिले असून त्यांचे जुने सहकारी सलीम मलिक यांच्यावर अक्रमने मोठा आरोप केला आहे. मलिक पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज राहिले आहेत. अक्रमसाठी ते वरिष्ठ खेळाडू असून ‘त्यांनी मला एखाद्या नोकरासारखी वागणूक दिली’, असा आरोप अक्रमने केला आहे. 

वसीम अक्रम (Wasim Akram) 1984 साली पाकिस्तान संघासाठी पहिला आंतरारष्ट्रीय सामना खेळला होता. त्यावेळी सलीम मलिक (Salim Malik) पाकिस्तान संघाचे वरिष्ठ खेळाडू होते. अक्रमच्या मते संघातील वरिष्ठ खेळाडू असल्याचा फायदा घेत मलिकने त्यांना नोकरासारखी वागणूक दिली.  एवढेच नाही त्यावेळी संघातील रमीझ, ताहिर, मोहसिन खान आणि शोएब मोहम्मद यांच्यावर देकील अक्रमने निशाणा साधला आहे.

वसीम अक्रमने हे सर्व खुलासे त्याची आत्मकथा ‘सुल्तान: एक आठवण’ या पुस्तकातून केले आहेत. अक्रमने पुस्तकात लिहिले आहे की, “ते मी लहान असल्याचा फायदा उचलत होते. ते नकारात्मक आणि स्वार्थी होते. तो माझ्यासोबत एका नोकरासारखे वर्तन करायचा.” पुस्तकात असेही लिहिले गेले आहे की, “तो मला त्याची मालिश करायला लावायचा. त्याने मला कपडे आणि शुज साफ करायला देखील सांगितले होते. मला तेव्हा खूप राग आला होता, जेव्हा रमीज, ताहिर, मोहसिन, शोएब मोहम्मद अशा संघातील काही युवा खेळाडूंनी मला नाइट क्लबसाठी बोलवले होते”

सलीम मलिककडून अक्रमच्या आरोपांना प्रत्युत्तर –
दरम्यान, अक्रमच्या या आरोपांना सलीम मलिककडून देकील प्रत्युत्तर दिले गेले आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मलिक म्हणाले की, “मी त्याला (अक्रम) फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने उत्तर दिले नाहीये. मी त्याला विचारेल की, त्याने जे लिहिले आहे, त्याचे खरे कारण काय आहे. जर मी नकारात्मक विचार करणारा असतो, तर मी त्याला गोलंदाजीची संधीच दिली नसती. मी त्याला नक्की विचारेल की, त्याने माझ्याविषयी असे का लिहिले.”

https://www.instagram.com/p/CiUm0AXsWpV/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, वसीम अक्रम 1992 ते 1995 या दरम्यानच्या काळात सलीम मलिक यांच्या नेतृत्वात पाकिस्तान संघासाठी खेळले आहेत. अनेकदा या दोन दिग्गजांमधील संबंध खराब असल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत असायच्या. आता अक्रमने त्याच्या पुस्तकातून ही गोष्ट स्पष्ट केली आहे. अक्रम दिग्गज वेगवान होतेच, पण त्यांनी कर्णधाराची भूमिका देखील चोखपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ 25 कसोटी आणि 109 एकदिवसीय सामने खेळला. यापैकी 12 कसोटी सामने पाकिस्तानने जिंकले, तर 8 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राहिलेले 5 कसोटी सामने अनिर्णीत राहिले. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने अक्रमच्या नेतृत्वात 66 विजय, तर 41 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. (‘I treated like a servant…’, Wasim Akram made big accusations against the veteran.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो आता आणखीनच धोकादायक झालाय’; इंग्लंडच्या खेळाडूने मान्य केले विराटचे मोठेपण
विश्वचषकात रोहितसोबत सलामीला कोण येणार? गिलची सरासरीने 78, तर धवनची आकडेवारीही धमाकेदार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---