भारतीय संघ पुढच्या वर्षी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षा आणि यावर्षी खेळल्या गेलेल्या लागोपाट दोन टी-20 विश्वचषकांमध्ये भारताला अपयश मिळाले आहे. असात आगामी एकदिवसीय विश्वचषकात या निराशाजनक खेळीची कसर भरून काढण्यासाठी संघ प्रयत्न करेल. कर्णधार रोहित शर्मा आगामी विश्वचषकात नेहमीप्रमाणे सलामीला येईल यात शंका नाही, पण त्याच्यासोबत दुसरा सलामीवीर फलंदाज कोण असेल? असा प्रश्न सध्या अनेकांना सतावत आहे. युवा शुबमन गिल विश्वचषकात भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो, असेही अनेकांचे मत आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर उपस्थित नाहीत. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन (Shikhar Dhawan) एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत आहे. तर सलामीला धवनच्या साथीने शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी मिळत आहे. गिने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 50 तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 45 धावांची खेळी. दुसऱ्या सामन्यात गिल मोठी खेळी करण्याच्या विचाराने खेळत होता, पण तितक्यात पावसामने हजेरी लावली आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. गिलचा सध्याचा फॉर्म पाहता चाहते त्याला आगामी एकदिवसीय विश्वचषकात संधी द्या, अशी मागणी करू लागले आहेत.
शुबमन गिलची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी –
शुबमन गिल (Shubman Gill) याच्या त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर 2019 मध्ये त्याने या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत गिलला एकूण 14 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे आणि यामध्ये त्याने 674 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये त्याला फक्त दोन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामथ्ये 16 धावा केल्या. 2020 मध्ये गिलने 1 एकदिवसीय सामना खेळला, ज्यात तो 33 धावा करू शकला. 2021 मध्ये त्याने फक्त एक एकदिवसीय सामना खेळला आणि निवडकर्त्यांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वाटत होते. पण तितिक्यात 2022 मध्ये त्याला नशिबाची साथ मिळाली असे आपण म्हणू शकतो. त्याने चालू वर्षात एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये 78.12 च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी पाहता गिल आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार बनला आहे.
मागच्या मोठ्या काळापासून रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये –
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारतासाठी 2019 एकदिवसीय विश्वचषकात पाच षटके ठोकली होती. मात्र, त्यानंतर रोहितचा फॉर्म दिवसेंदिवस खालावत गेला. त्याने 2021 मध्येही चाहत्यांची चांगलीच निराशा केली आहे. यादरम्यान त्याने 9 एकदिवसीय सामने खेळले आणि एकही शतक करू शकला नाही. केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नाही, तर टी-20 फॉरमॅटमध्येही तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे भारतीय संघ मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात चागंलाच अडचणीत आला होता. असे असले तरी, रोहित सध्या संघाचा नियमित कर्णधार आहे आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकात देखील तो संघाचे नेतृत्व करेल, यात सध्यातरी कोणतीच शंका उफस्थित होत नाही. विश्वचषकात रोहित भारताच्या डावाची सुरुवात करेल, यातही कुठलीच शंका नाही.
धवनलाही मिळू शकतो विश्वचषक खेळण्याची संधी –
रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून वारंवार विश्रांती घेत असल्याचेही दिसले आहे. त्याच्या अनुपस्थितीचा फायदा मात्र अनुभवी शिखर धवनला होत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचे नेतृत्व करताना दिसतो. धवन सध्या भारताच्या टी-20 आणि कसोटी संघातून बाहेर आहे, पण एकदिवसीय संघासाठी त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याने 2021 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 24 सामने खेळले असून 44.71 च्या सरासरीने 939 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे. अशात विश्वचषक संघातून त्याला वगळणे निवडकर्त्यांसाठी थोडे कठीणच असेल.
केएल राहुलचा फॉर्मही खराब-
केएल राहुल (Rahul Dravid) भारताच्या सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. राहुल भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये ‘मॅच विनर’ची भूमिका पार पाडताना दिसला आहे. मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. मोठ्या संघांविरुद्ध खेळताना राहुलची बॅट नेहमीच शांत दिसली आहे. अशात आगामी विश्वचषकात त्याला सलामीवीराच्या रूपात संधी मिळेलेच, अशी शक्यता कमीच आहे. (Who will open with Rohit in the World Cup? Gill’s averages on 78, while Dhawan’s statistics are also impressive.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात खेळायचा एक रुपयाही घेणार नाही स्टोक्स! कारण वाचून कराल कौतुक
”मेस्सी असा होता ज्याचा आपण कधीही अनुभव घेतला नव्हता”, एफसी गोवाचा बचावपटू मार्क व्हॅलिएंट