---Advertisement---

‘मला गोलंदाजी करायची आहे, पण…’, श्रेयस अय्यरचा गोलंदाजी करण्याबाबत धक्कादायक खुलासा

On: सोमवार, डिसेंबर 4, 2023 2:10 PM
Shreyas Iyer
---Advertisement---

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने गोलंदाजी का करत नाही हे सांगितले. अय्यरच्या म्हणण्यानुसार, त्याला सामन्यादरम्यान गोलंदाजी करायची आहे परंतु स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकाने त्याला मनाई केली आहे.

खरंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे बराच काळ संघातून बाहेर होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मैदानाबाहेर राहावे लागले आणि कदाचित त्यामुळेच त्याला सध्या गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यानंतर श्रेयस अय्यरने सांगितले की तो गोलंदाजी का करत नाही. “तो म्हणाला, मला गोलंदाजी करायची आहे पण स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकांनी मला मनाई केली आहे. मी आता काही काळ गोलंदाजी करू नये हे त्यांचे म्हणने बरोबर आहे.”

बेंगलोर येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 37 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल (Axar Patel) याने 21 चेंडूत 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारू संघ केवळ 154 धावा करू शकला. मुकेश कुमार (Mukesh Kumar) याने 3 तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे भारतीय संघाने ही मालिका 4-1 ने जिंकली आहे.

भारतीय संघाला आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे, जिथे कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेतही चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. (I want to bowl but Shreyas Iyer’s shocking revelation about bowling)

मबत्वाच्या बातम्या

Pro Kabaddi League 2023: बेंगळुरू बुल्सचा धुव्वा उडवत गुजरात जायंट्सने मिळवला सलग दुसरा विजय
‘MS Dhoniची एकच गोष्ट डोक्यात राहिली आणि…’, इंग्लंडच्या नांग्या ठेचताच विंडीजच्या कर्णधाराचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---