---Advertisement---

Pro Kabaddi League 2023: बेंगळुरू बुल्सचा धुव्वा उडवत गुजरात जायंट्सने मिळवला सलग दुसरा विजय

On: सोमवार, डिसेंबर 4, 2023 1:49 PM
Gujarat-Giants
---Advertisement---

PKL 10: प्रो कबड्डी 2023 स्पर्धेला शनिवारपासून (दि. 2 डिसेंबर) सुरुवात झाली. या स्पर्धेतील आतापर्यंत 4 सामने पार पडले आहेत. यातील चौथा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स संघात अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने दणदणीत विजय मिळवला. या नजीकच्या सामन्यात गुजरातने 34-31ने विजय मिळवला. हा गुजरातचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता.

पहिल्या हाफमध्ये बेंगळुरूकडे होती आघाडी
खरं तर, प्रो कबड्डी लीग 2023 (Pro Kabaddi League 2023) स्पर्धेतील गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स (Gujarat Giants vs Bengaluru Bulls) यांच्यात पार पडलेल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये बेंगळुरूने आघाडी घेतली होती. त्यांच्याकडे तब्बल 6 पॉईंट्सची आघाडी होती. गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघ पहिल्या हाफमध्ये ऑलआऊट झाला होता. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये संघाचे रेडर आणि डिफेंडर दोन्हीही लयीत परतले. 28व्या मिनिटाला बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) संघाला ऑलआऊट करत गुजरातने सामन्यात पहिली आघाडी घेतली.

सामन्यातील 35व्या मिनिटाला बेंगळुरूने पुन्हा आघाडी घेतली. त्यानंतर सामना 30-30 असा बरोबरीत आला. यानंतर राकेश आणि सौरव गुलिया यांच्या सुपर टॅकलने गुजरातला 2 महत्त्वाचे पॉईंट्स दिले. शेवटी संघ 34-31ने सामना जिंकण्यात यशस्वी झाला. गुजरातसाठी सब्स्टिट्यूट खेळाडू सोनूने सर्वाधिक 12 पॉईंट्स मिळवले. यामध्ये 10 रेड पॉईंट्सचा समावेश होता. तसेच, बेंगळुरूसाठी भरतने 7, तर विकास कंडोलाने 6 पॉईंट्स मिळवले.

गुजरातचा सलग दुसरा विजय
विशेष म्हणजे, गुजरातने बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताच, हा त्यांचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यापूर्वी गुजरातने स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात तेलुगू टायटन्स संघाचा 38-32 ने पराभव केला होता. (Gujarat Giants second win in a row against Bengaluru Bulls Pro Kabaddi 10)

हेही वाचा-
PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याचे संघ जाहीर, सायली जाधव, विक्रम कदम करणार नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---